12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.
नवी दिल्ली.अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून पॉक्सो कायद्यात बदल करण्याबाबत अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे.केंद्र सरकारने 12 वर्षांखालील मुलींवरील बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पॉक्सो कायद्यात बदल करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. अल्पवयीन मुलींवरील बलात्कारासंदर्भातील याचिका सुनावणीला आली असता, केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें