विधान परिषद स्थानिक मतदार संघ - सहा जिल्हयात आचार संहिता लागू. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 21 अप्रैल 2018

विधान परिषद स्थानिक मतदार संघ - सहा जिल्हयात आचार संहिता लागू.

विधान परिषद स्थानिक मतदार संघ - सहा जिल्हयात आचार संहिता लागू.



विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर; २१ मे रोजी होणार मतदान..

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा निवडणूक आयोगान केली आहे.

उस्मानाबाद-लातूर-बीड मतदार संघाचे आ. दिलीपराव देशमुख, परभणी-हिंगोलीचे आ. अब्दुल्ला खान दुर्रानी, नाशिकचे आ. जयवंतराव जाधव, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीचे आ. मितेश बांगडीया, अमरावतीचे आ. प्रवीण पोटे यांचा कार्यकाल २१ जून रोजी तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गचे आ. अनिल तटकरे यांचा कार्यकाल ३१ मे रोजी पूर्ण होत आहे. या सहा जागांसाठी आचारसंहितेची घोषणा आणि निवडणुकांचे वेळापत्रक आज निवडणूक आयोगाने जाहीर केले.

वेळापत्रकात नमूद केल्यानुसार निवडणुकीची सूचना २६ एप्रिल, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ मे, अर्जछाननी ४ मे, उमेदवारी मागे घेण्याची तारीख ७ मे असणार आहे. मतदान २१ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालवधीत होणार असून मतमोजणी २४ मे रोजी होणार आहे. २९ मे पर्यंत हि सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडणे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें