कठुआ आणि उन्नाव येथील घटनेच्या निषेधार्थ भोकरदन येथे अमन ग्रुपच्यावतीने कैण्डल मार्च काढण्यात आले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 16 अप्रैल 2018

कठुआ आणि उन्नाव येथील घटनेच्या निषेधार्थ भोकरदन येथे अमन ग्रुपच्यावतीने कैण्डल मार्च काढण्यात आले.

कठुआ आणि उन्नाव येथील घटनेच्या निषेधार्थ भोकरदन येथे  अमन ग्रुपच्यावतीने कैण्डल मार्च काढण्यात आले.

+अमन ग्रुच्या वतिने निवेदनाद्यावारे राष्ट्रपती यांना या प्रकरणातील आरोपिना फाशीची शिक्षा देण्याची मागनी.

शे.सलिम.
प्रतिनिधी.भोकरदन.
भोकरदन जि.जालना येथें रविवार दिनांक 15 रोजी संध्याकाळी 7 वाजता कठुआ (जम्मू-काश्मीर) येथील निष्पाप बालीका आसिफा आणि उन्नाव (उत्तर प्रदेश) येथील एक तरुणी या दोघींवर बलात्कार करुन निर्घृण हत्या करुन माणूसकीला काळीमा फासणारी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या, त्या नराधामांना शासनांनी तात्काळ  फाशीची शिक्षा द्यावी म्हणून भोकरदन येथील सामाजिक संघटना "अमन ग्रुप" च्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आले मोर्चा मरकस मस्जिद,पोलिस्टेशन,आंबेडकर चौक ते शिवाजी पुतळ्या पर्यन्त काढन्यात आला,व सोमवारी 11 वा भोकरदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतीनां निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की कठु आ(जम्मू-काश्मीर) व उन्नव(उत्तर प्रदेश) येथील या दोघींवर बलात्कार करून निर्घृण हत्या करून माणुसकीला काळीमा फसणारी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या ,त्या नारधमांना शासनाने तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व  या घटनेच्या निषेधार्थ या मोर्चात काढण्यात आला भोकरदन येथील विविध राजकीय नेत्यांनी, व्यापारी वर्गांनी, सामाजिक संघटना, संस्था, आणी सर्व जातीच्या हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून त्या नराधामांना फाशीच्या तक्त्यावर लटकवण्यात यावे या मागणीसाठी कॅन्डल मार्च मध्ये आपला सहभाग नोंदविला.यावेळी अमन गुरुपचे आसिफ कुरेशी,याकूब मान्सूरी, इरफान पठाण,शेख सलीम,साबेर सर,मसूद सिद्दीकी,शेख अशपाक,शेख मुक्तार,झाहेद शेख,शेख निसार,अमजत पठाण,अफसर भाई,रामेशवर जंजाळ,अप्पासाहेब जाधव, राहुल देशमुख,प्रिथम जाधव,रणजित जाधव,उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी,माजी.नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव,माजी.नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख,लक्ष्मण दळवी,मराठा सेवा संघाचे जंजाळ ,छावा संघटनेचे विष्णू गाढे,जीवराग सर,पालकर सर,वकील संघाचे सुहास जाधव,जैन संघटनेचे मुयर  बकलीवल,सुरेश तळेकर,नगरसेवक रणवीर जाधव,नसीम पठाण,कदिर बापू,जफर भाई,रिझवान भाई,सत्तर सेठ,रमेश जाधव, माजी.नगरसेवक अनिल देशपांडे सहीत शहरातील हजारोच्या संख्येत लोक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें