मुलिवर होणार्या आत्याचारा विरोधात देशभरात विरोध प्रदर्शची लाट.
देशभरात मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. जम्मु - काश्मीर मध्ये तर नराधमांनी राक्षसी प्रवृत्तीचा कळसच गाठला . एका आठ वर्षाच्या चिमुकलीला धार्मिक स्थळात डांबून ठेऊन सामूहिक अत्याचार करण्यात आले. यानंतर तिला दगडाने ठेचून ठार मारण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा घटनांनी अवघा देश शहराला. बदनापूर शहरात देखील या घटनेचे पडसाद उमटले नसते तर नवलच. शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी कँडल मार्च काढला. बलात्कार करणाऱ्या पाशवी लोकांना केवळ आणि केवळ फाशीच झाली पाहिजे, पीडित कुटुंबाला न्याय द्या तसेच बलात्कारासारख्या घटनेतील आरोपितांना फाशी देण्यात यावी असा कायदा समत करा, अशी मागणी देखील कठोर शब्दात व प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली. शाब्बास बदनापूर आपण सर्व एकजूट होऊन अशा घटनेच्या विरोधात आणि पीडित कुटुंबाच्या समर्थनार्थ उभे राहिलात. मी आभार व्यक्त करतो आजच्या कँडल मार्चमध्ये सहभागी झालेल्या माझ्या माय - माऊल्यांचे, बघिणी व प्रत्यक्षात आज भासलेल्या वाघिणींचे.. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा जजबा असाच कायम ठेवा.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें