आरोग्य सेविका सतत गैरहजर राहत असल्याने तरुणांनी आरोग्य उपकेंद्राला ठोकले कुलुप.
महिनाभरापूर्वी ग्रामसभेत कुलूप ठोकण्याचा दिला होता इशारा.
शे.सलिम.प्रतिनिधी-
भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथिल आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका सतत गैरहजर राहत असल्याने गावातील गरोदर महिलांना,अपंगांना, वृद्धांना,बालकांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्याने गावातील तरुणांनी आरोग्य उपकेंद्राला कुलूप ठोकले.याअगोदर जुलै महिन्यात जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी अमोल गिते यांना सुद्धा निवेदन देऊन तक्रार केली होती ,त्यांनी आरोग्य सेविकेला नोटीस पाठविली मात्र आरोग्य सेविका यांनी यापुढे गैरहजर राहणार नाही असे सांगितले होते. परंतू आरोग्य सेविका आठवड्यातुन एकदाच कार्यालयात येत असल्याने 23 मार्च रोजी तरुणांनी ग्रामसभा घेतली होती परंतु तेव्हाही त्या ग्रामसभेला गैरहजर होत्या.तेव्हाही तरुणांनी ग्रामसभेत कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.मात्र त्यात काही सुधारणा झाली नसल्याने तरुणांनी कार्यालयाला कुलूप ठोकले.तसेच आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सहाय्यक एम.पी.दांडगे हे सुद्धा पंधरवड्यातुन एकदाच फिरकत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.यानंतर जर सुधारणा झाली नाही तर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा यावेळी तरुणांनी दिला.गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र 10 ते 12 किलोमीटर असल्याने रुग्णांची जाण्यायेण्याची गैरसोय होते.त्यामुळे रात्रीचे शहराच्या ठिकाणी रूग्णांना जायचे झाले तर आर्थिक झळ सोसावा लागतोय.त्यामुळे तरुणांनी आरोग्य उपकेंद्राला कुलूप ठोकले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी लोखंडे,पवनपुत्र सेवाभावी संस्थेचे अनिल भुतेकर, सतिष लोखंडे,बालाजी लोखंडे,वाल्मिक लोखंडे,नारायण लोखंडे,कृष्णा लोखंडे, विष्णु जाधव,प्रदिप लोखंडे,संदीप भोकरे, गजानन लोखंडे,शिवराम जऱ्हाड,अर्जुन खांडवे,समाधान लोखंडे, दत्तू लोखंडे ,बळीराम लोखंडे,बापु लोखंडे आदींची उपस्थिती होती.
प्रतिक्रिया-
आम्हाला आठवडाभर नवनवीन कँप, लसीकरण, मिटींग,तसेच इतर गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे मला आठवड्यातून एकदाच जाणे शक्य होते.आरोग्य उपकेंद्रात साहित्याची कमतरता आहे .
वाय. डी. गायकवाड - आरोग्य सेविका
प्रतिक्रिया-
गावात आरोग्य उपकेंद्र असून कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांना आर्थिक झळ सोसावा लागत आहे .याची दखल आरोग्य अधिकारी यांनी घेण्याची गरज आहे.
बालाजी लोखंडे- ग्रा.सदस्य बरंजळा लोखंडे
प्रतिक्रिया- आम्ही आरोग्य उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांना महिनाभरापूर्वी ग्रामसभेला हजर रहा म्हणून नोटीस पाठविली होती मात्र त्यांनी गैरहजर राहून कुठलेच समाधानकारक उत्तर दिले नाही ग्रामसभेत त्यांना सुद्धा काही अडचण असेल तर मदत करण्यात येईल व अडीअडचणी जाणून घेता येतील हा प्रामाणिक हेतू होता .वैयक्तिक त्रास देण्याचा कुठलाच हेतू नव्हता. यापुढे लेखी घेतल्याशिवाय कुलुप उघडणार नाही.जर यात सुधारणा झाली नाही तर आम्ही जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांच्याकडे निलंबन करण्याची मागणी करणार आहोत.नारायण. आर.लोखंडे- ग्रामस्थ-बरंजळा लोखंडे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें