बाजार समितीच्या स्वच्छतागृहात तरुणाने विष प्राशन केल्याने खळबळ .
समशेर खान.
प्रतिनिधी
सेलु तालुक्यातील मालेटाकळी येथील एका 31 वर्षे वयाच्या तरुणाने मोंढा परिसरात असलेल्या बाजार समितीच्या स्वच्छतागृहतच विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली आहे ही घटना शुक्रवारी रोजी दुपारी एक वाजता घडली याबाबतची समजलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील मालेटाकळी येथील एका 31 वर्षे वयाच्या तरुणाने मोंढा परिसरात असलेल्या स्वच्छतागृहात सोबत आणलेली विष प्राशन केले विषाचा उग्र दर्द आणि एकंदरीत स्थिती वरून हा घडला प्रकार पाहणाऱ्यांनी लगेच धावपळ करून त्या तरूणास सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत या तरुणाला परभणी येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात दुपारी तीन वाजल्या पासून त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे या तरुणास दाखल करणाऱ्यांनी कळविले आहे दरम्यान या प्रकरणाची सेलू पोलीस ठाण्यात नोंदच नसल्यामुळे तरुणाचे नाव व कशामुळे विष प्राशन केले हे समजू शकले नाही परंतु संपूर्ण मोंढा परिसरात घडलेल्या घटनेची आणि त्या तरूणास आणि मिळालेला तात्काळ उपचाराबद्दल चर्चा मात्र सुरू होती रुग्णालयात वेळेत दाखल केल्यामुळे अनुचित प्रकार मात्र टळला आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें