वालुर ते सेलु रोडवरील राजवाडी नदिच्या पुला जवळ दुचाकी स्वाराचा मृत्यु.
+आपघात कि घातपात या बद्दल शंका.
वालुर ते सेलु रोडवरील दुधना नदिच्या पुलावर मोटार सायकल वरुन पडुन एकाचा मृत्यु झाल्याची घटना 13 एप्रील रोजी उघडकिस आली आहे.
राजवाडी जवळील दुधना नदिच्या पुलावर अच्युत दादाराव झोल (65 वर्ष) रा.ब्राम्हणगाव ता.सेलु.जि.परभणी.स्पलेंडर मोटर सायकल सह मयत आवस्थेत दिसुन आल्याची माहिती काहि नागरीकांनी पोलिसांना दिली.सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसानि घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह श्वविच्छदनेसाठि सेलु उपजिल्हा रुग्णाल्यास पाठवले.दरम्यान पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें