ब्राह्मणगावच्या इसमाचा नदीपात्रात आढळला मृतदेह. अपघात की घातपात प्रकरण गुलदस्त्यात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 14 अप्रैल 2018

ब्राह्मणगावच्या इसमाचा नदीपात्रात आढळला मृतदेह. अपघात की घातपात प्रकरण गुलदस्त्यात.

ब्राह्मणगावच्या इसमाचा नदीपात्रात आढळला मृतदेह.


अपघात की घातपात प्रकरण गुलदस्त्यात.
संग्रहित


समशेर खान.
सेलू प्रतिनिधी
सेलु तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील एका इसमाचा मृतदेह दुधना नदी पात्रात आढळून आला असून मयत इसमच्या  डोक्याच्या पाठीमागे शस्त्राने मारहाण झाल्याची मोठी जखम असून हा अपघात आहे की घातपात हे पोलिस तपासानंतरच कळू शकेल ही घटना शुक्रवार दि 13 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील अच्युतराव दादाराव झोल वय 63 वर्षे यांचे प्रेत सेलु-वालुर रस्त्यावरील असलेल्या दुधना नदी पात्रात ब्राह्मणगावा जवळ सकाळी नऊच्या सुमारास आढळून आले मयत अच्युतराव झोल यांची मोटारसायकल घटनास्थळा जवळच  पडलेली आढळून आली त्यांचा  अपघात  झाला असता तर अंगावर अन्य ठिकाणी जखमा आढळून आल्या आसत्या परंतु डोक्याच्या पाठीमागे शस्त्राचा खोलवर वार होता यावरून त्यांचा मृत्यू अपघाताने झाला की हा घातपाताने हे मात्र पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे दरम्यान मयत अच्युतराव झोल यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात येऊन शवविच्छेदन नंतर प्रेत नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले मयताचा मृत्यू डोक्यावरील गंभीर जखमेमुळे झाल्याचे शव विच्छेदन करणाऱ्या डॉक्टर निकाळजे यांनी सांगितले परंतु सेलु  पोलीस ठाण्यात घटनेच्या संदर्भात बातमी लिहीपर्यंत नोंद करण्यात आली नसल्याचे ठाण्यातून सांगण्यात आले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें