निरागस प्रेमाची अभिव्यक्ती हिरवं कोवळं पान =कवी फ.मु.शिंदे.
परभणी : प्रेम हे वैश्विक असून माणसाला काही काळ का होईना दुःख विसरायला लावणारी भावना आहे. सुरेश हिवाळे यांच्या हिरवं कोवळं पान या कविता संग्रहात याची प्रचिती पानापानातून शब्दागणिक येते. प्रत्यक्षात निरागस प्रेमाची अभिव्यक्ती हिरवं कोवळं पान आहे. असे मत ज्येष्ठ कवी फ.मुं.शिंदे यांनी व्यक्त केले.शहरातील शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने कवी सुरेश हिवाळे लिखित 'हिरवं कोवळं पान' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दि.२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रा.इंद्रजित भालेराव हे होते. व्यासपीठावर कवी प्रा. जयराम खेडेकर,प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव,लेखक बा.बा.कोटंबे,प्रा.शेख शफी आदींची उपस्थिती होती. प्रा.फ.मुं.शिंदे पुढे म्हणाले की,कविता आत्म्याचा आवाज आहे. अंतरीक तालाने कविता तोलामोलाची होते.माणसाला आपले आयुष्य जगत असताना आयुष्यातील भोगलेल्या सुख दुःखांना व्यक्त होण्यासाठी जागा हवी असते. सशक्तपणे व्यक्त होण्यासाठी कविता हेच माध्यम आहे.
या वेळी प्रा. इंद्रजित भालेराव म्हणाले की, सुरेश हिवाळेंच्या 'हिरवं कोवळं पान' या कवितासंग्रहात सुफी कवितेसारखी कविता आहे. या संग्रहातील अष्टाक्षरी व अभंग कवितांची निर्मिती चांगली आहे,असे सांगून त्यांनी कविता संग्रहाचे भावविश्व उलगडले. कवी डॉ. केशव खटींग यांनी प्रास्ताविक केले.अरूण चव्हाळ यांनी कार्यक्रमाची भुमिका मांडली.सुञसंचालन अरविंद सगर यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद ठाकर यांनी केले.
परभणी : येथील कवी सुरेश हिवाळे यांच्या हिरवं कोवळं पान या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रा.फ.मुं. शिंदे यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रा.इंद्रजित भालेराव,प्रा.जयराम खेडेकर,प्राचार्य बाळासाहेब जाधव,बा.बा.कोटंबे,सुरेश हिवाळे,विठ्ठल भुसारे,केशव खटींग,कांचन हिवाळे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें