सेलु येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 अप्रैल 2018

सेलु येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी.

सेलु येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी.

सेलू : पुरूषासह महिलांची उल्लेखनीय उपस्थीती.


 सेलू (प्रतिनिधी )
वीरशैव समाज सेवा समिती , शंकर लिंग मंदिर संस्थान व शिवा अखिल भारतीय युवक संघटनेच्या वतीने २२ एप्रिल रोजी दुपारी ५वा. शंकरलींग  मंदिर येथून महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला ट्रॅक्टरवर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिनिधी केलेली सजावट हि सोसळ्याचे  आकर्षण ठरले. ढोल-ताशाचा गजर महिला व पुरुषांचा सहभाग ,वाद्यांचा निनांद , लेझीम पथकाचा  खेळ यामुळे मिरवणुकीमध्ये रंजकता वाढली होती . बसवेश्वर कीर्तीची विज कडकडली , लिंगायत धर्माची  ध्वजा फडकली या गर्जनेत तीन तास भव्य मिरवणूक संपन्न झाली  यानंतर शंकर लिंग मंदिरात  मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामअप्पा तोडकर तर मंचावर शिवकुमार नावडे निजलिंगप्पा तरवडे ,राजेंद्र महाजन अशोकअप्पा वाडकर, महादेव आगजाळ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास हरिश्चंद्र साडेगांवर , शिवशंकर नावाडे ,गुरूबसअप्पा  पंचगल्ले ,दत्ता्त्रय  मिटकर ,बबनअप्पा झमकडे राजेंद्र नावाडे ,छगनअप्पा विर  रामदास पाटील अँड गिरीष साडेगांवकर ,नगरसेवक बालासाहेब झमकडे ,विनोद तरटे , यांची विशेष उपस्थिती होती .  सूत्रसंचालन कैलास मलवडे यांनी केले तर रेवणअप्पा  साळेगावकर यांनी आभार मानले
                       कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभमं  महाजन, विश्वनाथ हुगे ,शुभंम सोळंके ,विशाल साखरे, ओंकार महाजन ,पवन मिटकरी, आदेश आगजाळ,शाम राऊत ,शिवहर विर, ,शंकरराव राऊत , सोमेश्वर राऊत,शुभंम  नवघरे , राहुल क्षिरसागर ,अनिल नवघरे ,पप्पू महाजन ,बाळू क्षिरसागर , अमोल महाजन  आदींनी परिश्रम घेतले .


*पुरस्काराने सन्मान*
            उल्लेखनीय असे सामाजिक कार्य करणारे जगन्नाथअप्पा चाकोते व संभाप्पा विर गुरूजी यांचा शाल श्रीफळ साडीचोळी स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सपत्नीक सेवा गौरव सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .यावेळी सत्काराला उत्तर देताना संभाप्पा वीर म्हणाले की सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कामाची दखल घेऊन उत्सव समितीच्यावतीने माझा सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून  यापुढेही माझी सामाजिक सेवा चालू राहील असे त्यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें