शावजी नागोराव सोनाळे यांचे निधन.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.१४एप्रिल २०१८
सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे (किमान कौशल्य अभ्यासक्रम) प्राध्यापक सिद्धार्थ सोनाळे यांचे वडील शावजी नागोराव सोनाळे यांचे वयाच्या ८५व्या वर्षी व्रध्दपकाळाने चुंचा (ता.कळमनुरी जि.हिंगोली) येथे आज दि.१४ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ०४.३० वाजताच्या सुमारास दुख: निधन झाले. सुभाष सोनाळे, नागोराव सोनाळे व सिद्धार्थ सोनाळे यांचे ते वडील होत. शांत स्वभावी व मितभाषी म्हणुन सर्व परिचित असलेल्या शावजी सोनाळे यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचावर उद्या दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता चुंचा (ता.कळमनुरी जि.हिंगोली) येथील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंतीम संस्कार करण्यात येनार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें