सेलु येथे कै.नारायण चिमणाजी बारडकर यांच्या बाराव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने कवि संमेलन संपन्न.
समशेर खानसेलू ÷दि 17 /4/सोमवार रोजी शहरातील बाल कवी पू ना बारडकर यांच्या वडील क़ै नारायणराव चिमनाजी बारडकर यांच्या बाराव्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील गणेश नगर मधील साई प्रसाद निवास स्थानी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जयंत नाईक, तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी संतोष नारानकर परभणी, विशेष उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड दत्तात्रेय रोकडे यांची उपस्थित होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक बाल कवी पू ना बारडकर सर यांणी केले. या कार्यक्रमात दत्तात्रेय रोकडे, कैलास लवेकर, आश्विनी घोगरे, शरद ठाकर, डिगांबर रोकडे, एजाज पठान,आर्जुण महाजण, यांणी आपल्या कवितेत, शेतकरी, आई वडील, भाऊ व बहिण, पत्नी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सैक्षणीक अशा विविध कविता सादर करून मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक पू ना बारडकर. सुत्रसंचलण डिगांबर रोकडे, तर आभार रंजीत बारडकर यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें