मानवत येथील आदर्श शिक्षिका रिज्वाना बेगम यांचा सत्कार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 17 अप्रैल 2018

मानवत येथील आदर्श शिक्षिका रिज्वाना बेगम यांचा सत्कार.

मानवत येथील आदर्श शिक्षिका रिज्वाना बेगम यांचा सत्कार.


मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.२७: मानवत येथील जि.प.उर्दु  प्राथमिक शाळा शाखा क्र.१ च्या  शिक्षीका रिज्वाना बेगम शेख मुनीरोदिन  यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल नुक्तेच आदर्श  शिक्षक पुरस्कार  मिळाल्या बद्दल मानवत येथील जमीअत उलुमा अरशद मदनी व सफा बैतुलमाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज दि.१७ एप्रिल रोजी त्यांचा  शाळेत शाल,हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.हाफेज लतीफ बागवान हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन सय्यद समीर,अब्दुल हाफीज पञकार ,करिम मिर्झा,अय्युब मिलन बागवान ,हाफेज मेहराज,म.मुस्ताक ,बेलदार संघटनाचे मराठवाडा संघटक मुस्तखीम बेलदार आदी उपस्थीत होते.या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थि व शिक्षकानी आपले मनोगत व्यक्त करुन शिक्षीका रिज्वाना बेगम शेख मुनीरोदिन यांना शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाचे सुञसंचालन मुर्तुजा सर यांनी केले तर आभार रज्जाक सर यांनी मानले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद मुर्तुजा,म.लईक सर,अ.रज्जाक सर,म.शयबाज सर,म.जावेद सर,मिर महमद सर,हकीम सर,लाड सर,राहत मँडम ,निखत मँडम उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें