मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; नादुरूस्त कारला धक्का देताना टेम्पोने उडवले, तिघे जागीच ठार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 30 अप्रैल 2018

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; नादुरूस्त कारला धक्का देताना टेम्पोने उडवले, तिघे जागीच ठार.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; नादुरूस्त कारला धक्का देताना टेम्पोने उडवले, तिघे जागीच ठार.

नादुरूस्त कारला धक्का मारताना टेम्पोने दिलेल्या धडकेत तिघे जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेल जवळ आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास घडला. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक माहिती अशी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ ओम्नी कार बंद पडली होती. काही जण बंद पडलेल्या कारला धक्का मारत बाजूला घेत होते. त्याचवेळी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या भरधाव टेम्पोने त्या कारला उडवले. अपघात इतका भीषण होता की यात कारला धक्का मारणारे तिघे जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला काढण्यात येत आहे. अपघातानंतर वाहतूक काही काळ खोळंबली होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें