सराटी - बोदवड येथील सिमेंट बंधारा कामे निकृष्ठ.
काॅन्ट्रॅक्टरने केला दगडांचा वापर;
शेख कलीमसिल्लोड (प्रतिनिधी)दि 29
सिल्लोड तालुक्यातील सराटी - बोदवड परिसरात जलयुक्त शिवार योजना अंतर्गत सिमेंट बंधारा कामे हाती घेण्यात आली पण या कामांमध्ये मोठ - मोठी - दगड गोटे वापरून सदरील कामे ही राञी - बे - राञीही सुरू ठेवून कामे निकृष्ठ दर्जाचे करण्यात आली आहे. सदरील सिमेंट बंधारा कामांची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी असी मागणी विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे लक्ष्मीबाई लहाने यांनी तक्रारीद्वारे केली आहे.
सिल्लोड तालुक्यातील सराटी - बोदवड येथील परिसरात जलयुक्त शिवार योजना अंतर्गत सिमेंट बंधारा कामे महिनाभरापुर्वी सुरू करण्यात आली. सदरील कामे सुरू केली असता वरच्या वरच चर खोदून कामे सुरू करण्यात आली. सदरील कामांमध्ये निकृष्ठ दर्जाच्या वाळूचा वापर करीत कमी प्रमाणात सिमेंट वापरून मोठ - मोठ्या दगड - गोटे - डबराचा वापर करून सिमेंट बंधारा कामे निकृष्ठ दर्जाचे करण्यात आली आहे. अनेकदा समज देऊनही ही कामे राञी बे - राञीही सुरू ठेऊन उरकली आहे. अधिकारी - कर्मचा-यांनाही या कामांबाबत समज देण्यात आली पण संबंधित अधिकारी - काॅन्ट्रॅक्टरच्या मिलीभगतमुळे सदरील कामे ही निकृष्ठ दर्जाची करण्यात आली आहे. वरिष्ठ
अधिका-यांनी सदरील कामांची चौकशी करुन अधिकारी - काॅन्ट्रॅक्टरांना दोषी धरीत बिलेही थांबवावी अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें