सेलु तालुक्यातील रवळगाव गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या.
दहा दिवसा मधील दुसरी घटना.
सेलू: प्रतिनिधी
समशेर खान.
तालुक्यातील रवळगाव येथील एका शेतक-याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि.२५ एप्रिल रोजी सकाळी घडली. रवळगावात दहा दिवसा पुर्वी १६एप्रिल रोजी शिवाजी जीजा रोडगे वय ६० वर्षे वयाच्या शेतक-याने आत्महत्या केली हि दुसरी घटनाआहे.या दोन्ही घटनामुळे रवळगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या आत्महत्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत ची माहिती याप्रमाणे रवळगाव तालुका सेलू येथील भगवान देविदास गाडेकर वय ७५ वर्षे या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार रोजी सकाळी पाच ते सातच्या दरम्यान घडली.
या घटनेची माहिती सेलू पोलीस ठाण्यात देण्यातआली असून याप्रकरणी कलम १७५ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत भगवान गाढेकर यांच्या पश्चात विवाहित दोन मुले एक मुलगी असा परिवारआहे. मयतावर सेलू उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्या नंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. रवळगाव येथे बुधवारी दुपारी ४वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कारकरण्यात आलेआहे. घटनेचा पुढील तपास शेख मुजीब ,हनुमान नाईक, विलास सातपुते, बाळू कदम हे करत आहेत.दरम्यान रवळगावात अवघ्या दहा दिवसाच्या फरकाने दोन वयोवृद्ध शेतक-यांनी गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें