72 तासाच्या आत पाणी टंचाई चे प्रस्ताव निकाली काढा - आ. अब्दुल सत्तार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 26 अप्रैल 2018

72 तासाच्या आत पाणी टंचाई चे प्रस्ताव निकाली काढा - आ. अब्दुल सत्तार.

72 तासाच्या आत पाणी टंचाई चे प्रस्ताव निकाली काढा - आ. अब्दुल सत्तार.

शे.कलिम.
सिल्लाेड दि.२६(प्रतिनिधि) पाणी  टंचाईची भिषनता तालुकाभर पसरलेली आहे अशा परीस्थीतीत शासकीय यंत्रनांनी मानुसकीला जागवत पाणीटंचाईचे प्रस्ताव बहात्तर तासात निकाली काढुन रोजगार हमीची मंजूर कामे त्वरित सुरू करा नसता प्रशासकीय अधीकारी व कर्मचारी यांच्यावर समन्वय समीती कारवाई
करेल असा इशारा समन्वय समीतीचे अध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला.

गुरवार(२६)पंचायत समीतीच्या आवारात समन्वय समीतीची बैठक माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी विविध तक्रारी केल्यात. यावरून लोकप्रतिनिधी ,  नागरिक व  प्रशासकीय यंत्रणेत परस्पर समनव्याचा अभाव असल्याचा कारणावरून आ. अब्दुल सत्तार यांनी वरील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

जिल्हा परीषदचे उपाध्यक्ष केशवराव तायडे,नगराध्यक्ष अब्दुल समीर,तालुका काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष देवीदास लाेखंडे,समीतीचे सदस्य सुरेश बनकर,श्री.द्यानेश्वर माेठे ,सभापती द्यानेश्वर तायडे,नगरसेवक सुदर्शन अग्रवाल,जिल्हा परीषद सदस्य सिमा गव्हाणे,मिनाताई गायकवाड,सरपंच दुर्गाबाई पवार,उपविभागीय पाेलीस अधिकारी गणेश बिराजदार,पाेलीस निरिक्षक भगीरथ देशमुख,पाेलीस निरिक्षक विश्वास देशमुख गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे,नायब तहसिलदार संजय साेनवने,नायब तहसिलदार श्री.कुलकर्णी , आदींची यावेळी प्रमुख उपस्थीती हाेती.

सिल्लाेड तालुका भिषन पाणीटंचाईला सामाेरे जात असतांना तालुक्यातील काही तलावात पाण्याचा अवैध उपसा हाेत असल्याच्या तक्रारीचा पाढा नागरीकांनी वाचला.यावर समीती नेमुन अवैध उपसा व भुसंपादन झालेले धरन क्षेत्र ताब्यात घेण्याच्या सुचना आमदार सत्तार यांनी संबंधित एजन्सींना दिल्या. यासाेबतच टँकर प्रस्तावावर दिरंगाई हाेत आहे ही दिरंगाई म्हणजे गलथान कारभाराचा कळस असून हे खपवुन घेतल्या जानार नाही .असा सज्जड दम आमदार सत्तार यांनी शासकीय यंत्रनांना दिला.

स्वच्छता गृहाचे बांधकाम हाेउनही लाभार्थांंना पैसे मिळत नसल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य अक्षय मगर यांनी केली.तर लघु पाटबंधारे स्थानीक स्तरचे उपविभागीय अभियंता श्री.साेनवने हे जलयुक्तच्या कामात मनमानी करतात असा आराेप बहुतांश सरपंच व तालुक्यातील ग्रामस्थांनी केला.यावर उत्तर देता देता उपविभागीय अभियंता साेनवने हे चांगलेच कैचीत पकडल्या गेल्याचे दिसले.

राेजगार हमी याेजनांची कामे करतांना पंचायत समीती विभागास धारेवर धरन्यात आले.दुश्काळ व टंचाई लक्षात घेता मजुरांच्या कामांना हात मिळत नाही यासाठी यंत्रनेने तत्पर रहावे नसता काम मागणीनंतर पगारातुन पैसे कापन्यात याची भान ठेवावी असे आमदार सत्तार म्हणाले.रसत्यांच्या कामातुनच दुश्काळात राेजगार मिळताे यासाठी रसत्यांच्या कामांना मंजुरी मिळावी अशी सुचना यावेळी करण्यात आली.

बैठकीस जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश दाैड,उपनगराध्यक्ष शंकुतलाबाई बनसाेड,कृष्णा उखर्डे,प्रा.गाेविंदराव भाेजने,दामाेधर गव्हाणे,सतीश ताठे,, अशोक सूर्यवंशी ,पंचायत समीती सदस्य सरीता  चव्हाण,कासाबाई गवळे,शेख सलीम,सत्तार बागवान,निजाम पठाण,अली चाउस,सरपंच कलाबाई अहिरे,सरपंच मंदाबाई गवळे,सरपंच अंकुश पाटील,सरपंच राजकुमार भाेटकर,श्री.दांडगे,महेबुब पठाण, आदीसह विविध गावातील सरपंच,सदस्य,पदाधिकारी व शासकीय यंत्रनांचे प्रतिनिधि उपस्थित हाेते.
 जलयुक्तची कामे झालेल्या गावात पाणीटंचाई!           दरम्यान सिल्लाेड तालुक्यात जलयुक्त शिवारची कामे हाेउनही त्या गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे.यामुळे जलयुक्तची झालेल्या कामाबाबत बैठकीत राेष व्यक्त करण्यात आला.ही कामे कागदावरच झाली की निकृष्ट झाली.यावर भर बैठकीत उपस्थीतांकडून चर्चा झाली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें