सेलु तालुका दुधना नदी पात्रातील आवैध वाळू उपसा प्रकरण.
महसूल प्रशासनाने दाखविले नदीपात्रातील जेसीबी काठावर ठेवण्याची सौजन्य.
सेलू प्रतिनिधी
समशेर खान.
सेलु तालुक्यातील काजळी रोहीणा व राजवाडी येथील ग्रामस्थांनी वाळूउपसा ची तक्रार उपविभागीय अधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी संबंधितांना बजावल्यामुळे नदीपात्रात वाळू उपसा करणारी जीसीबी बाहेर नदीकाठावर ठेवण्यास संबंधित ठेकेदारास लावले आहे परंतु त्यावर कारवाई मात्र करण्यात आली नाही ही कारवाई बुधवार 25 एप्रिल रोजी करण्यात आली आहे दरम्यान दैनिक देशोन्नती ने 25 एप्रिल च्या अंकात दुधना नदी पात्रातून बेकायदेशीर उत्खनन अशी बातमी प्रकाशित केली होती या बातमीच्या दणक्याने महसूल प्रशासन ताळ्यावर आले आणि त्यांना तात्काळ दखल घेऊन जेसीबी वर कारवाई केली नसली तरी पण नदी पात्रात अवैध उत्खनन करणारे जेसीबी मात्र नदीच्या काठावर आणून ठेवले आहे या कारवाईत नायब तहसीलदार प्रशांत थारकर काजळी रोहीणा सज्जाचे तलाठी हनुमान बोरकर राजेश कटारे यशवंत सोडगीर अशोक भवर आदीसह पोलीस पाटील विठ्ठलराव काष्ठे यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात भेट दिली असता ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर प्रमाणे नदीपात्रात जेसीबी आढळून आला ही कारवाई करण्यात आल्यानंतर याच रस्त्यावर वाडी येथे वाळूचे चार ट्रॅक्टर आढळून आले त्यांची चौकशीही करण्यात येत असून त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करण्यात आली हे अधिकृत समजू शकले नाही
वाळू बंदी कागदावर टॅक्टर व हायवा मात्र रस्त्यावर नदीपात्रातील वाळू उत्खननावर महसूल प्रशासनाने कितीही बंधने असले तरी शहरात सर्वच भागात बांधकामा समोर अनेक ढिगारे आढळून येतात याचाच अर्थ वाळू उत्खनन चालू आहे शहरात रात्रीचा दिवस करून ट्रॅक्टर व हायवा या वाहनाद्वारे वाळूचा पुरवठा करण्यात येत असतो हा सर्व प्रकार पाहिला तर वाळू बंदी कागदावर व हायवा रस्त्यावर म्हणण्याची वेळ आली आहे जेवढ्या निर्भयपणे नदीपात्रात जेसीबी द्वारे उत्खनन केले जाते तेवढ्यात धाडसाने उत्खनन केलेली वाळू दाम दुप्पट वसूल करून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात येते हे शहरातील ढिगार्या वरुन दिसून येते अधिकृत ठेकेदार देखील त्यांना दिलेल्या नियम डावलून उत्खनन करतो आणि महसूल प्रशासन यांचा बोभाटा झाल्यावर कारवाईचा देखावा करते तसेच नदीच्या काठावर ठेवलेल्या जेसीबी वरून स्पष्ट होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें