बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
शेख सलीमप्रतिनिधी- भोकरदन
भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण लोखंडे हे तर प्रमुख पाहुणे शालेय समिती अध्यक्ष हिरालाल जावळे हे होते.बाबासाहेबांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक पी.डी. सोळुंके तसेच मान्यवरांनी पुष्पहार अर्प करून अभिवादन केले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषणे झाली.यावेळी भास्कर राऊत,केशव खांडवे,जगन लोखंडे,संदिप भोकरे,कृष्णा लोखंडे, समाधान लोखंडे,शिक्षक गजेंद्र येवले,सचिन वाघ,संजय लोखंडे,गजानन लोखंडे ,श्रीमती कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें