भोकरदन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 14 अप्रैल 2018

भोकरदन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

भोकरदन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

शेख सलीम
  भोकरदन प्रतिनिधी : विश्वरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त भोकरदन शहरात सकाळ पासूनच विविध कार्यक्रम संपन्न झाली.
  सकाळी 09:00 वा. सम्राट अशोक बुद्ध विहार येथे नगरसेवक दीपक बोर्डे,व नगरसेविका निर्मला ताई भिसे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजरोहन करण्यात आले.त्यानंतर विहारात सहमुहिक बुद्ध वंदना तसेच विविध मन्यवारांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर रमाई नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ एड.डि. एस. जाधव यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.तर सिल्लोड कॉर्नर वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति चे सचिव सचिन पारखे आयोजित कार्यक्रमा नंतर माजी नगरध्यक्ष राजाभाऊ देशमुख व उपनगरध्यक्ष इरफ़ान सिद्धिकी, यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सहमुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
  यावेळी माजी नगरध्यक्ष चंद्रकांत पगारे, नगरसेवक दीपक बोर्डे,सार्वजनिक जयंती उत्सव समिति अध्यक्ष एड. डी. एस. जाधव,नगरसेविका निर्मला ताई भिसे,नगसेवक अब्दुल कदीर,रणवीरसिंह देशमुख, शामराव दांडगे, भारिपचे प्रदीप जोगदंडे,प्रभाकर बोर्डे,रमेश बिरारे,रमेश पगारे,सुरेश पैठने,त्र्यंबक पाबळे,रवि मोरे,प्रा. टि. आर. कांबळे,फकीरा देशमुख, विजय सोनवणे,गनेश औटि, सुरेश बनकर,महेश देशपांडे,कमलकिशोर जोगदंडे,द्रोपदाबाई वाघ,यादवराव पगारे यांच्या सह बहुसंख्य पदाधिकारी,जयंती उत्सव समिति चे पदाधिकारी,विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,आजी माजी नगरसेवक,प्रतिष्ठित नागरिक तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 दरम्यान सिल्लोड कॉर्नर वरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळया जवळ माजी सैनिक साहेबराव पारखे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त पेढ़े वाटप करण्यात आले.
  त्यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास रमाई नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या पुतळया जवळ मुख्य कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी उपविभगीय अधिकारी हरीशचंद्र गवळी,प्रतिष्ठित नागरिक व जयंती उत्सव समितीचे प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें