हजारों भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.
![]() |
भोकरदन, ता.१३ (बातमीदार)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार दिंडोरी प्रणित भोकरदन केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त सुरु असलेल्या सप्ताह सोहळ्याची शुक्रवारी दिनांक १३ रोजी महाप्रसादाने सांगता झाली. या महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
भोकरदन शहरातील जुनी बाजार पट्टी भागातील श्री स्वामी समर्थ केंद्रात स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त दिनांक ७ ते १३ एप्रिल विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. या सप्ताह सोहळ्यात गुरुचरित्र पारायणासह दररोजची नित्यसेवा, त्रिकाल आरती, स्वामी चरित्र, स्वामी जप माळ, दुर्गा सप्तशती, श्री मल्हारी सप्तशती पाठाचे वाचन घेण्यात आले. याशिवाय शुक्रवारी महाप्रसाद (भांडराचा) कार्यक्रम संपन्न झाला. या महाप्रसादाचा शहरासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
फोटो क्र.०१ भोकरदन: श्री स्वामी समर्थ केंद्रात महाप्रसादाचा लाभ घेतांना भाविक.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें