14 एप्रिल साठी नगर परिषद सज्ज - नगराध्यक्ष अब्दुल समीर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

14 एप्रिल साठी नगर परिषद सज्ज - नगराध्यक्ष अब्दुल समीर.

14 एप्रिल साठी नगर परिषद सज्ज -  नगराध्यक्ष अब्दुल समीर.


सिल्लोड (प्रतिनिधी शेखकलीम) दि.13, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव निमित्त सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरात विद्युत रोषणाई तसेच मिरवणूक मार्गातील रस्त्याची दुरुस्ती व इतर सुविधा देत नगर परिषद सज्ज असल्याची माहिती नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी दिली. 14 एप्रिल च्या पूर्वसंध्येला नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नगर परिषदेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसोबत शहरात पाहणी केली यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी याबाबत माहिती दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, स्नेहनगर, भगवान गौतम बुद्ध पुतळा परिसर, समता नगर, शिक्षक कॉलनी , डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक यासाहित विविध भागात दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने स्वछता,याभागात प्रखर विद्युत व्यवस्था, यासोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी,पुतळा परिसरात एलईडी लाईट, हायमस्ट उभारण्यात आले. मीरवणूक मार्गातील रस्त्याची दुरुस्ती , मिरवणूक दरम्यान पिण्याचे पाणी, रुग्णवाहिका इत्यादी सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणार असून यासाठी नगर परिषद  सज्ज असल्याचे स्पष्ट करीत शहरातील डॉ. आंबेडकर नगर, स्नेहनगर, जय भवानी नगर, रजाळ वाडी, जयभीम नगर, इर्यादी दलित वस्तीमध्ये नगर परिषदेच्या वतीने अत्याधुनिक पद्धतीचे एलईडी , सिमेंट कोंक्रेट रस्ते, नाल्या इत्यादी कामे यापूर्वीच पूर्ण करण्यात आले असून काही भागातील राहिलेले काम प्रगती पथावर सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी दिली.

चौकट           सभागृहाचे लोकार्पण व मार्गाचा शुभारंभभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त स्नेह नगर भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह ( मजला 2 ) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाचा शुभारंभ उद्या दि.14 एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते प्रभाकरराव पालोदकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमास नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर , काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी 10 वाजता होणाऱ्या या सोहळयास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें