महामानवाने दिलेल्या घटनेतुनच तळागळातील जनतेला संरक्षण --- आ.अब्दुल सत्तार.
सर्वश्रेष्ठ राज्यघटनेला बदलण्याचा प्रतिगाम्यांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी पुरोगाम्यांनी एकत्र यावे - आ.अब्दुल सत्तार.
डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ;
जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण तर मार्ग कमानीच्या कामाचा शुभारंभ.
शेख कलीम
सिल्लोड : प्रतिनिधि ( दि.१४ ) -
जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना महामानवाने दिल्यानेच तळागळातील लाेकांना आज संरक्षण कवच मिळाले असून सामान्य कुटूंबातील व्यक्तीही लोकशाही व बाबासाहेबानी दिलेल्या मताच्या शक्तीच्या बळावर शासनकर्ता जमात होतांना दिसत आहे.या घटनेला काही विध्वंसक प्रवृत्तीची मंडळी बदलण्याचा प्रयत्न करीत आहे.अशा हुकूमशाही व जातीयवादी प्रतिगामी प्रवृत्तीचा मुकाबला करण्यासाठी पुरोगामी विचाराच्या ताकदीने एकत्र येण्याची ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्य सिल्लाेड शहरात अभिवादन कार्यक्रम प्रसंगी केले.
डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यास तसेच गांधी भवन येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात आ.अब्दुल सत्तार यांनी महामानवाच्या विविध पैलुंचा उजाळा देत डॉ.बाबासाहेबानी आपले जीवन जगतांना स्वतासाठी नव्हे तर रंजलेल्या गांजलेल्या समाजाला शासनकर्ती जमात म्हणून पुढे आणण्यासाठी झोपलेल्या व आर्थिक शैक्षणिक व सामाजिक कमकुवत असलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी रात्र रात्र जागून जीवाचे रान करून जीवन वेचले व सामाजीक समतेतुन समाजात डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शक शिकवन दिली असल्याचे ते म्हणाले.
नगरपालीकेतर्फे महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग कमान कामाचे उदघाटन व डाँ.बाबासाहेब आंबेडकर सामाजीक सभागृहाचे उदघाटन माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार,डाँ.शिवानंद भानुसे,(प्रदेश प्रवक्ता संभाजी बिर्गेड ,महाराष्ट्र) तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देविदास लाेखंडे,कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती रामदास पालाेदकर,उपसभापती नंदकिशोर सहारे, उपनगराध्यक्ष शंकुतलाबाई बनसाेड,मुख्याधिकारी अशाेक कायंदे,दामाेधर गव्हाणे,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,जिल्हा परीषद सदस्य मिनाताई गायकवाड़,प्रा.मन्सुर कादरी,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,संजय आरके, नगरसेवक रऊफ बागवान,सत्तार हुसैन,देवेंद्र सुर्यवंशी,राजु साठे,राजरत्न निकम,ताई निकम,शांतिलाल अग्रवाल,शेख सलीम,दशरथ सुरडकर,शेख सलीम,संजय मुरकुटे, कैसर आझाद,राजरत्न निकम,जितेंद्र आरके,अमीत आरके,राजेश्वर आरके,मनाेहर आरके,जगन्नाथ कुदळ,रवी आरके,साहेबराव सिरसाठ,सलीम पठाण,विनाेद गायकवाड़,मतीन देशमुख, फईम पठाण, आदींची यावेळी उपस्थिती हाेती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण व मार्गाचा शुभारंभ
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त स्नेह नगर व गौतम नगर भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह दुसरा मजला तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाच्या कमानीच्या कामाचा शुभारंभ दि.१४ शनिवार रोजी जिप उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास नगराध्यक्ष अब्दुल समीर, बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर , उपसभापती नंदकिशोर सहारे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, जिप सदस्या मीनाताई गायकवाड, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, महिला काँग्रेसच्या दुर्गाताई पवार, मुख्याधिकारी अशोक कायंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें