सोस येथील ग्रामस्थांचे श्रमदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी सरसावले .
जिंतूर प्रतिनीधी
तालुक्यातील सोस येथील ग्रामस्थ मागील काही दिवसांपासून पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदान करून पर्यंत करत आहेत यात 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावातील महिला पुरुषांसह तरुणांनी उत्स्फुर्त सहभागी होत श्रमदान करून अभिवादन केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात 14 एप्रिल रोजी विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते याचेच औचित्य साधून तालुक्यातील सोस येथील ग्रामस्थांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावात नाचून साजरी करण्यापेक्षा एक दिवस गाव पाणीदार करण्यासाठी संपूर्ण गावाने श्रमदान करण्याचे ठरविण्यात आले होते यावेळी सकाळीच गावात दवंडी देऊन गावकऱ्यांना माहिती देण्यात आली होती सकाळी 9 गावातील तरुण महिला पुरुषांनी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रमदानाचा कार्यक्रम राबवून सि सि टी चे खोदकाम करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे व तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खोदकाम करण्यासाठी लागणारे खोरे,टोपले,टिकास आदी साहित्य दान स्वरूपात देण्यात आले तसेच जोगवाडा येथील सोपान मस्के,आदिनाथ गिरी व त्यांच्या मित्रांनी सहभागी होऊन श्रमदान केले म्हणून अशा आगळ्यावेगळ्या जयंतीचा कार्यक्रम राबवून गावाने एक आदर्श निर्माण केला आहे यावेळी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या युवकांनी आपले गाव पाणीदार करण्यासाठी कोणकोणती कामे हाती घेऊन कोणत्या पद्धतीने ती राबवायची याची माहिती देऊन गावाला दुष्काळ मुक्त कसे करता येईल यासाठी सर्वांनी सहभागी होऊन तण मन धनाने व एकजुटीने काम करावे असे आवाहन करण्यात आले जयंती निमित्त श्रमदान करण्यासाठी वसंत मगर,भास्कर शिंदे महादेव शिंदे,भगवान पाटील,संतोष शिंदे,ज्ञानोबा शिंदे,परमेश्वर शिंदे,मनोज मगर,सोमेश्वर उदावंत,शेख खमरोद्दीन,सचिन गंडले,राहुल सूर्यवंशी,भाऊराव गंडले,सुधाकर गंडले,देविदास पाटील,निळकंठ शिंदे,भगवान शिंदे,दिग्विजय मगर,विशाल मगर,मनोज मगर,आसाराम पाटील,योगेश शिंदे,भैया शिंदे आदीने पर्यंत केले यावेळी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें