श्रमदानातून भोसी गाव होणार पाणीदार ; पाणी फाउंडेशनचा पुढाकार; महिला पुरुष लागले कामाला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 14 अप्रैल 2018

श्रमदानातून भोसी गाव होणार पाणीदार ; पाणी फाउंडेशनचा पुढाकार; महिला पुरुष लागले कामाला.

श्रमदानातून भोसी गाव होणार पाणीदार ; पाणी फाउंडेशनचा पुढाकार; महिला पुरुष लागले कामाला.

जिंतूर----- तालुक्यातील भोसी हे गाव पण पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून  गावातील 150 ते 200 ग्रामस्था मार्फत सकाळी 6 वा आपल्या गावातील ओसाड माळरावर श्रमदान करून चर खोदने सोस खड्डे आदी कामे करून आपले भोसी गाव भविष्यात बारमाही पाणीदार कसे होईल या कडे ओढ लागल्याचे चित्र भोसी या गावी दिसून येत आहे 
 चौकटग्रामस्थांनी 14 एप्रिल या  डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीचे औचित्त साधून सर्व श्रमदानावरील आंबेडकरी अनुयायी सोबत ईतर सर्व गावातील मंडळीनी जातीय एकोपा सलोखा जपत श्रमदान स्थळी हर्ष उल्हासात बाबाची जयंती साजरी करून भोसी या गावाने नवा आदर्श जोपासला आहे 
--------------------------
    या श्रमदान योगदानात भोसी येथील सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन या पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे यात गावातील सरपंच गणेश  ठोंबरे उपसरपंच बाबाराव ठोंबरे पंचायत समिती सदस्या त्रिवेना ठोंबरे या सह ग्रामसेवक एन बी भानट विष्णू ठोंबरे विठल ठोंबरे अनिल ठोंबरे मनोहर चव्हाण नामदेव जटाळे विष्णू मुटकुळे संजय ठोंबरे रामभाऊ शिंदे ज्ञानेश्वर ठोंबरे पत्रकार म्हणून निमंत्रित गुनिरत्न वाकोडे व सचिन रायपत्रेवार यांच्या सहभागा सह या सह विद्या ठोंबरे राधिका ठोंबरे मीराबाई ठोंबरे कुंता ठोंबरे शारदा लता ठोंबरे व जयाबाई चव्हान रत्नमाला चव्हाण आदी असंख्य महिलांचा पण सामवेश या श्रमदान कामात सहभाग होता
     विशेष बाब म्हणजे गावातील नाव्ही आप्पा कंठाळे यांनी बोलकी प्रतिक्रिया देत असे सांगितले की माझे भोसी गाव पाणीदार व्हावे या हेतूने मी माझ्या कामातून वेळ काढून श्रमदान करून दररोज सहभाग नोंदवीत असल्याचे सांगितले
    अधिकृत माहिती देताना विष्णू ठोंबरे यांनी असे स्पष्ट केले की आम्ही स्पर्धे पूर्वी 28 गुणांचे नियोजन पूर्ण केले असून श्रमदानाचे लक्ष्य 13000 घनमीटर आहे तर मशीनचे लक्ष्य 3 लाख घनमीटर आहे तालुक्यात आमचे गाव पूर्णपणे पाणीदार कसे चमकेल या हेतूने शाळकरी विध्यार्थी  महीला तरुण वयस्क आदीचा उदंड प्रतिसाद भेटत असून श्रमदाना वरील ग्रामस्थांना गावतीलच "भोमेश्वर अक्वा" च्या वतीने मोफत जारच्या थंड पिण्याच्या पाण्याची सोय केल्याचे सागीतले
   भोसी या गावी उपविभागीय अधिकारी अनिल कर्डीले यांनी भोसी या गावास पाणी फाउंडेशनचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी व ग्रामस्थाना  प्रेरीत करण्या साठी 4 ते 5 वेळ भेटी देऊन सविस्तर मार्गदर्शन केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें