बिड,जालना जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या टोळीवर 'मोक्का' - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

बिड,जालना जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या टोळीवर 'मोक्का'

बिड,जालना जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या टोळीवर 'मोक्का'


बीड - खून, दरोडा, घरफोड्या आणि प्रकरणातील सराईत गुन्हेगारांची धरपकड करून त्यांच्यावर कडक कारवाया करण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा धडाका कायम असून आणखी एका गुन्हेगार टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे.

परळी तालुक्यातील मांडेखेल शिवकन्या आणि मधुकर नागरगोजे हे दांपत्य मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या दोघांनी त्यांना रस्त्यात अडवून चाकुंच अधाक दाखवून त्यांच्याजवळील ६० हजार रुपये किमतीचे दागिने लुटले होते. याप्रकरणी शिवकन्या नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर कलम ३९४, ३९५ अश्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद झाला होता. जिल्हा पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे आणि सहा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पाळवदे, परळी ग्रामीणचे सपोनि एस.एस.चाटे, अंबाजोगाई ग्रामीणचे निरीक्षक सुरेंद्र गंदम आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला. तेंव्हा, जालना जिल्ह्यातील बाल्या उर्फ बालाजी पंडीत काळे (ह.मु. कवडगाव घोडा ता. परळी) याने त्याचे इतर चार साथीदारासह हा गुन्हा केल्याचे तपासात आढळून आले. तसेच, या टोळीने यापूर्वी बीड जिल्ह्यातील सिरसाळा, तलवडा, अंबाजोगाई, परळी आणि जालना जिल्ह्यातील तसेच गौदी, अंबड हद्दीत घरफोड्या, जबरीचोर्‍या, दुखापत, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगनणे, दरोडा घालणे या सारखे दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी बीड पोलिसांनी सदर टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यास मागितलेल्या परवानगीला अनुमती दिली.

त्यानुसार सदर टोळीवर लावण्यात आलेल्या कलमात आता ‘मोक्का’ची वाढ करण्यात आली आहे. भविष्यातही गुन्हेगार टोळ्याविरूद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें