शांतता समितीची बैठक संपन्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

शांतता समितीची बैठक संपन्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न.

शांतता समितीची बैठक संपन्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ जयंती  पार्शवभुमीवर सोनपेठ पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक दि. १३ रोजी पोलिस स्थानकात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर उप निरीक्षक मुपडे, प्रभाकर शिरसाठ, सुधीर बिंदु रुस्तुम तुपसंमुद्रे ,उत्तम भाग्यवंत प्रमुख उपस्थिती होती या बैठकीचे प्रास्ताविक संतोष मुपडे यांनी केले तर प्रभाकर शिरसाठ ,सुधीर बिंदु,रुस्तुम तुपसंमुद्रे,उत्तम भाग्यवंत यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करतांना सोपान शिरसाठ यांनी करतांना जयंती उत्सव समितीच्या सदस्यांना सुचना देऊन जयंती उत्साहात व शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले. या बैठकीस तालुक्यातील जयंती उत्सव समितीचे सदस्य ,पोलीस पाटील व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीसाठी काळे ,दिलीप निलपत्रेवार यांनी परीश्रम घेतले.आभार प्रदर्शन अशोक तिरमले यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें