मानवत शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
जय भिम च्या गजरात शहर दनदनुन गेले.
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.१६: मानवत येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त मोठ्या उत्साहाने सर्वधर्मिय अशी भुतोना भविष्य अशी डॉ. बाबासाहेबाची जयंती १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात आली. शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभीवादन करण्यासाठि सकाळपासुनच नागरीकानी गर्दी केली होती तर सकाळी १० वाजता डॉ.आंबेडकर नगर येथे बाबासाहेबाना वंदना अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले या अभिवादन सभेचे प्रमुख उदघाटक डॉ . अंकुश लाड होते तर अभिवादन सभेच्या कार्याक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक राजुभैय्या खरात होते प्रमुख पाहुणे नगरसेवक अंनद भदर्गे ,नगरसेवक विनोद राहाटे होते . या कार्यक्रमात येथिल पुतळ्याच्या व सभागृहाच्या कामाचे उदघाटन करण्यात आले व दोन तिन महिण्यात सुशोभिकर व सभागृहाचे पुतळ्याचे काम पुर्ण करणात येइल असे युवानेते डॉ.अंकुश लाड यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सुञसंचलन अमोल मगर यांनी केले आभार चदु मगर यांनी केले तर बौध्दनगर येथे ही वंदना च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे चे उदघाटन मानवत तहसिलदार नकुल वाघुंडे यांनी केले तर प्रमुख पाहुणे शामभाऊ चव्हाण अनंद भदर्गे मानवत पञकार संघाचे अध्यक्ष सत्यशिल धबडगे होते बौध्दनगर येथिल अभिवादन कार्यक्रमात गुनवंत विद्यार्थाच्या सत्कार व नव्याने पोलिस भरती व विविध पदवीधर व झालेल्या सर्व विद्यार्थाच्या सत्कार करण्यात आला . सुञसंचलन विजय खरात यांनी केले तर अभार नगरसेवक अनंद भदर्गे यांनी मानले तर दुपारी ४ वाजता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूकीची सुरूवात झाली यात शहरातील बौध्दनगर , डॉ.आंबेडकर नगर , पंचशिल नगर , लिबोणी नगर , शाहु नगर , येथिल नागरिकांनी व महिलांनी लहान लेकरा सह जयंती मिरवणूकीत सहभागी झाले तर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक मुख्यबाजारपेठे आल्यावर छञपती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष भागवत शिंदे व त्याच्या छञपती फाऊंडेशन चे सर्व सदस्याच्या वतिने शरबत वाटप करण्यात आले तसेच पेठमोहल्ला येथे मुस्लीम बांधवाच्या वतीने पाणीचे वाटप करण्यात आले व रवि पंडित मिञमंडाळाच्या वतिने रवि पंडित , बाबा शेख, बजरंग ढवळे, पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले तर सार्वजनिक शिव जन्मोत्सव च्या वतिने ही पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले मानवत पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक किरण पवार यांनी मोठ्या प्रमाणात चोखबदोबस्त ठेवला होता. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीत सर्व हिन्दु मुस्लीम बांधवांनी मोठा सहभाग घेतला होता. जयभिम च्या गजरात मानवत शहर दनदनुन गेले होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें