मानवत तालुक्यात आ.मोहन फड यांच्या हस्ते विविध विकासकामाचे उदघाटन .
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.१६: मानवत तालुक्यातील सावरगाव व सावळी येथे पाथरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार मोहन फड यांच्याहस्ते विविध विकासकामाचे उदघाटन दि.१५ एप्रिल रोजी करण्यात आले.सावरगाव येथे सकाळी ९ वाजता ग्रामविकास विभाग २५१५ या शिर्षकाखाली रुपये १० लक्ष चे सी सी रोड व रुपये १० लक्षाचे संत सावता सभागृह तसेच ३ लक्ष रुपयाचे आमदार स्थानिक विकास निधीतुन सी सी रोड व जि.प.एस आर एफ निधीमधुन सावरगाव पाटी ते गावापर्यत २०लक्ष रुपये डाबरिकरन कामाचे उदघाटन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.मणीष चैतन्य महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन बाजार समीतीचे सभापती गंगाधरराव कदम ,पंकज आंबेगावकर ,सुरेशराव भुमरे,विठ्ठल काळे आदी उपस्थीत होते.तसेच सावळी येथे आमदार स्थानिक विकास निधीतुन ८ लक्ष रुपयाचे सी सी रोडाचे कामाचे उदघाटन करण्यात आले.सावळी येथील जि.प.प्रा.शाळाचे ई लर्निग चे उदघाटन हि करण्यात आले.यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मोहन फड म्हणाले की,शासन स्तरावरा प्रयत्न करुन भरपुर निधी गावाच्या विकासासाठी व मतदार संघातील जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यावर भर देतो जनता जागरुक आहे केलेल्या विकासकामाची पावती देत असते.ग्रामीण भागातील गावासाठी रस्ते,नाली,पाणीसाठी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करत आहे तसेच शेतरस्ते,पादनरस्ते करण्यावर आपला भर राहणार असे ते म्हणाले . यावेळी मणीष चैतन्य महाराज ,सुरेश भुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आभार सरपंच गजानन घाटुळ यांनी मानले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विठ्ठल काळे,रामेश्वर काळे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमात मोठ्यासंख्येने नागरीक उपस्थीत होते. आमदार मोहन फड यांनी विकासकामे गावागावात सुरु केल्यामुळे नागरीक समाधान व्यक्त करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें