माणुसकी आजपण जिवंत आहे . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

माणुसकी आजपण जिवंत आहे .

माणुसकी आजपण जिवंत आहे .   


आजय बोराडे.
 काल दि १२/०४/२०१८ रोजी घाटनांद्रा ता सिल्लोड येथील श्री अशोक अप्पा सोनू अप्पा गुळवे हे ऐपत प्रमाणपत्राच्या कामानिमित्त तहसील कार्यालय सिल्लोड येथे आले होते.
तहसील कार्यालयातील विधी संकलनाचे लिपिक श्री विजय भाऊसाहेब चव्हाण, कोतवाल श्री सुखदेव गवते  यांचे टेबल वर ते रु ५०,०००/- रोख रक्कम असलेली पिशवी ते विसरले आणि निघून गेले
नंतर लिपिक व कोतवाल यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यांना रोख रक्कम आढळली असता त्यांनी ती जपून कपाटात ठेवली व अर्जावरील भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून बोलावले व त्यांना सन्मानाने त्यांची रोख रक्कम असलेली पिशवी परत केली असता त्यांचे डोळ्यातून आनंदाश्रू आले.
या गौरवास्पद कामगिरी बद्दल नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी लिपिक श्री विजय चव्हाण व कोतवाल श्री सुखदेव गवते यांचे कौतुक केले तसेच त्यांचा शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ व रोख बक्षीस देऊन सत्कार केला त्या उभयतांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें