नारळाच्या नरवंटीपासून तो भागवतोय पक्षांची तहान. रस्त्यावर फेकलेल्या कच्च्या नारळाचे प्रयोग करून राबवला अनोखा उपक्रम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 अप्रैल 2018

नारळाच्या नरवंटीपासून तो भागवतोय पक्षांची तहान. रस्त्यावर फेकलेल्या कच्च्या नारळाचे प्रयोग करून राबवला अनोखा उपक्रम.

नारळाच्या नरवंटीपासून तो  भागवतोय पक्षांची तहान.

रस्त्यावर फेकलेल्या कच्च्या नारळाचे प्रयोग करून राबवला अनोखा उपक्रम.


प्रतिनिधी-शे.सलिम.
भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील तरुण शेतकरी नारायण रमेश लोखंडे याने शेतामध्ये झाडांवर पक्षांसाठी नारळाच्या नरवंटीपासून तयार केलेल्या कुंडीत पाण्याची व्यवस्था केली आहे. लोकं कच्चे नारळ पिऊन रस्त्यावर टाकतात माञ त्याचा काहीच फायदा होत नाही.परंतु नारायण लोखंडे या तरुणाने ते नारळ घरी नेऊन त्याला साफ करून ते व्यवस्थित करून त्याच्यापासून पक्षासाठी  पाण्याची सोय केल्यामुळे या तरुणाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.या तरुणाने शेतामध्ये एकूण 30 नारळाच्या नरवंटी तयार करून झाडाला बांधून पाण्याची सोय केली आहे.तसेच पक्षांसाठी दाणे सुद्धा टाकण्याचा संकल्प या तरुणाने केला.
उन्हाचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे माणसासहीत पक्षाची सुद्धा लाही लाही होत आहे. शेतामध्ये लांब लांब पर्यत कुठे पाण्याची व्यवस्था नसल्याने पक्षांची गैरसोय पाहून या तरुणाने  एकूण 30 नरवंटी तयार करून अनोखा उपक्रम राबविला.


प्रतिक्रिया-                                                                  हा उपक्रम निशुल्क असून सर्वांनी आपल्या घरापुढे एक कुंडी लावून पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे.मला माझ्या वडिलांनी यात मदत केली .यापुढे मी दरवर्षी हा उपक्रम हाती घेणार असून हे कार्य वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहील.

नारायण लोखंडे -तरुण शेतकरी

1 टिप्पणी: