त्या पेट्रोलपंपाची होणार तपासणी.
◆जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश.
समशेर खान.प्रतिनिधी.सेलु.
◆अ. भा. ग्राहक पंचायतच्या मागणीला यश.
सेलु(प्रतिनिधि) :शहरातील सि. टी. पारेख पेट्रोल पंपाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्यावतिने सदरिल पेट्रोल पंपाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष डाँ. विलास मोरे, ता. सचिव शिवाजी आकात यांनी केली होती. शहरातील सि. टी. पारेख पेट्रोलपंपावर 21मार्च रोजी तीनशे रुपयाच्या बदल्यात केवळ 475 मिली पेट्रोल टाकण्याचा प्रताप करण्यात आला होता. त्यानुसार सदरिल पेट्रोल पंपावर महसुल विभागाच्या पुरवठा विभागाने प्रत्यक्ष पंचनामा करुन सदरिल पेट्रोल पंपावर कमी पेट्रोल टाकण्यात आल्याची बाब समोर आली होती. 23 मार्च रोजी अखील भारतीय ग्राहक पंचायत सेलु शाखेच्यावतिने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे सदरिल पेट्रोल पंपाचा परवाना कायम स्वरुपी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषेदेच्या मासिक बैठकीमध्ये सदरिल पेट्रोल पंपाचा मुद्दा ग्राहक संरक्षण परीषेदेच्या सदस्यांनी उचलुन धरला होता त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी ही बाब गंभीर असुन त्या पेट्रोलपंपाची तपासणी करण्यात यावी असे आदेश तहसीलदार (तालुका संनियत्रण )यांना दिले आहेत येणा-या 15 एप्रिल पुर्वी या पेट्रोल पंपाची तपासणी समिती मार्फत करण्यात येणार आहे.यामुळे मापात पाप करणा-या पेट्रोलपंपांना निश्चितच पाबंद करण्यात यश येईल.
◆योग्य कार्यवाही होणे गरजेचे-शिवाजी आकात(ता. सचिव अ. भा. ग्राहक पंचायत, सेलु) शहरात पेट्रोलपंपावर ग्राहकांची लुट होत आहे. ग्राहक या बाबत विचारणा करण्याचे धाडस केले की, नाहक हे लोक ग्राहकांशी हुज्जत घालतात. यामुळे ग्राहक चुपचाप पेट्रोल भरुन निघुन जातात प्रत्येक पेट्रोल पंपावर मिटर सेट करुन पेट्रोल टाकण्यात आले पाहिजे तसेच या मापात पाप करणा-या पंपाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला तरच पेट्रोल चोरी कमी होईल व ग्राहकांना न्याय मिळेल.जो पर्यंत पेट्रोल पंपावर योग्य कार्यवाही होणार नाही तो पर्यंत अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी शांत बसणार नाहीत

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें