माणुसकी आली अपघातस्तळी धाऊन
वांगी येथील अपघात समयी युवकानि,राजकीय पुढऱ्यांनि केलि मदत.
आजय बोराडे.प्रतिनिधी.सिल्लोड.
भराडी येथून जवळच असलेल्या वांगी बू.येथील फाट्याजवळील अलटो कार नंबर एम.एच.20 डी.सी.4527 वरील चालक अब्द्दुल हामिद मेवाती यांच्या गाडीचे ब्रेक फैल होऊन नियंत्रण सुटल्याने व वळण रस्त्यावर गाड़ी नियत्रण सुटल्याने गाड़ी बाजूला असलेल्या बराशित जाऊन आदळली.यावेळी गाडीत प्रौढांसह बालचिमुकले मिळून 6 लोक गाडीत होते.
यावेळी बाइक वरुण जाणारे धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते अजय बोराडे यांना ओरडन्याचा आवाज येताच घटनास्तळी धाव घेऊन कारचा दरवाजा तोडून दोघांना बाहेर काढले.व अजय यांनी भराडी येथील सरपंचपति गजानन महाजन यांना भ्रमणध्वनिद्वारे संपर्क करून बोलऊन घेतले.तातडीने जास्तीची दुखापत झालेल्या अब्दुल हामिद,कुलसुम पठान,शेख राजियाबि पठान यांना तळनी येथील पंपचालक प्रभु वाघ यांच्या एम.एच.20 सी.म.1717 कार मधून सिल्लोड येथील उपआरोग्य केंद्रात दाखल करुण ऊपचार सुरु करण्यात आले.उर्वरित गाडीत असणाऱ्या प्रवश्यना भराडी येथील क्रूज़र गाडीने सिल्लोड पोहचविले.
सबंधित कुटुंब हे सारोळा ता.सिल्लोड येथून लग्नकार्य आटोपुन कुंजखेड़ा ता.कन्नड येथे जात असतानि हा अपघात घडला.अपघातस्तळी ओळखिचे कुणीही नसता रसत्यने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी प्रसंग अवधान राखून मदत केल्याने जखमीनि जखमा किती झाल्या याचा विचार न करता मदत झाली यांचे समाधान व्यक्त केले.शेवटी माणुसकी कामी आल्याच्या चर्चा होती.
अपघात होताच 108 नम्बरला संपर्क करताच त्यांनी कळविले की सिल्लोड व पालोद आरोग्य केंद्रातील एम्बुलेंस ही रुग्ण घेऊन गेलेली असून लगेच उपलब्ध होणार नसल्याचे कळविले.भराडी व सिल्लोड येथील सामाजिक प्रतिस्टानच्या एम्बुलेंसला संपर्क केला असता त्याही व्यस्त असल्याचे लक्षात आले.शेवटी खाजगी गाड्यांचा सहारा घ्यावा लागला.
यावेळी मदत कार्यात विजय काकडे,आसिफ पठान,आदींसह भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयाच्या शिक्षक ,बसचालक मालक मंडळीचि मदत झाली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें