मानवत कृ.ऊ.बा.समिती येथे शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन!
[] व्यापारी कमीभावाने कापुस खरेदि करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.५: मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समीती येथे कापसाच्या बाजार भावापेक्षा कमी भावदराने व्यापारी कापुस खरेदि करत असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी कापुस भाववाढ मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समीती येथे आज दि.५ एप्रिल रोजी ठिय्या आंदोलन केले.
आज मार्केट कमीटी च्या यार्डात कापुस विक्रिस आणलेल्या शेतकऱ्यांनी बीट थाबवुन कापसाला भाववाढ द्या या मागणीसाठी बीट बंद केले यावेळी सभापती गंगाधरराव कदम व सचीव बाळासाहेब कदम यांनी यार्डात येऊन शेतकऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न केला पण शेतकरी भाववाढीवर ठाम असल्याने ते निघुन गेले व त्यानंतर व्यापाऱ्यानी ही कापुस खरेदी बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समीती कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी देत आंदोलन केले व पुन्हा सभापती गंगाधरराव कदम यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांची समजुती करुन स्वत बीटावर व्यापाऱ्याना व शेतकऱ्यांना सोबत घेऊन कापुस विक्रि सुरळीतपणे सुरु केली व शेतकऱ्यांनी ही आंदोलन मागे घेतले. कापुस विक्रिस आणलेल्या शेतकऱ्यांचे असे म्हणने होते की कापुस उत्पादनास खर्च जास्त आला असुन शेतातील कापुस वेचणाऱ्यांना वीस रुपये किलो प्रमाणे पैशे द्यावे लागत आहे व वाहतुकीचा खर्च व ईतर पिकखर्च मोठ्याप्रमाणात झाले असल्याने व त्यात बोडअळीमुळे फार नुकसान झाले असुन त्यात मार्केट यार्डात कापसाला सेलु व परभणी पेक्षा कमी भाव व्यापारी देऊन शेतकऱ्यांची लुट करत आहे व व्यापारीवर बाजार समीतीचा कोणताच दबाव नसल्यामुळे व्यापारी मनमानी कारभार करत असुन शेतकऱ्यांचे कापुस कमी दराने खरेदी करत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें