शहीद जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे अनंतात विलीन, महाराष्ट्र शासनाच्या वतीने बबनराव लोणीकरांनी वाहिली श्रद्धांजली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 अप्रैल 2018

शहीद जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे अनंतात विलीन, महाराष्ट्र शासनाच्या वतीने बबनराव लोणीकरांनी वाहिली श्रद्धांजली.

शहीद जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे अनंतात विलीन, महाराष्ट्र शासनाच्या वतीने  बबनराव  लोणीकरांनी वाहिली श्रद्धांजली.

समशेर खान.

परभणी / प्रतिनिधी - शहीद जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे (२०) यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले परभणी  जिल्ह्यातील पालम तालुक्यातील कोनेरवाडी या त्यांच्या मुळगावी लिंगायत समाजाच्या धार्मिक विधीनुसार त्यांचा दफनविधी करण्यात आला. यावेळी मा मुखमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे आदेशानुसार सरकारचे वतीने  राज्याचे पाणी पुरवठा व स्वछता मंत्री,जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा  परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री  नामदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली यावेळी आमदार मोहन फड,आमदार राहुल पाटील, आमदार मधुसूदन केंद्रे, जिल्हाधिकारी पी शिवशंकर,एसडीएम,तहसीलदार,जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी,भारतीय सैन्यदलातील अनेक अधिकारी,गणेशराव रोकडे,अभय चाटे, बालाजी देसाई,शिवहरी खिस्ते  यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय अधिकारी  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टर सीमारेषेनजीक पाकने केलेल्या गोळीबाळात जवान शुभम मुस्तापुरे शहीद झाले होते.  शुभम यांच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा आणि दोन लहान भावंडे असा परिवार आहे.शुभम हे २ वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाले होते. यावेळी नामदार लोणीकर म्हणाले  कि धाडसी स्वभाव अशी शुभम यांची सैन्यात आणि गावात ओळख होती. भूमातेची सेवा करता करता अत्यंत कमी वयात त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान न विसरता येणारे आहे. शांत, सुस्वभावी मनमिळाऊ लढवय्ये आणि इतरांना मदत करणारा तरुण म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या प्रमाणेच गावातील तरुण सैन्यात भरती झाले पाहिजे, अशी त्यांची भावना होती.शुभमचे आई-वडील शेती करतात.शुभम यांच्या पश्चात आई सूनिता, वडील सुर्यकांत, भाऊ शिवम, हरीओम असा परिवार आहे. त्यांच्या दु:खाची बातमी कोनेरवाडी (ता.पालम) या त्यांच्या मुळ गावात पोहचताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला. संपूर्ण गावात एकही चूल पेटली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. भारत माता कि जय वंदे मातरम  शुभम मुस्तापुरे अमर रहे या जयघोषनाणी परिसर दणाणून सोडला लष्करातर्फे पार्थिवास पुष्पचक्र वाहून सलामी देण्यात आली.  शहीद जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे यांच्या कुटुंबीयास भारतीय सेनेच्या वतीने ४० लक्ष रुपय,जमू व काश्मीर सरकारच्या वतीने १० लक्ष व महाराष्ट्र सरकारच्या वतीने २५ लक्ष अशी एकूण ७५ लक्ष मदत देण्यात येणार आहे  त्यांचे आई वडिलांना पेन्शन व इतर सुविधा देण्यात येणार आहे तसेच उपस्थित जी प चे सिइओ यांना मुस्तापुरे यांच्या कुटुंबीयास प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ देणे बाबत कार्यवाही करणे बाबत सूचना केली आहे अशी माहिती नामदार लोणीकर यांनी या वेळी दिली

शहीदों की चिताओं पर
लगेंगे हर बरस मेले,
वतनपर मर मिटनेवालोंका
बाकी यही निशां होगा।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें