शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या.
सेलू तालुक्यातील रवळगाव येथील प्रकार.
सेलू प्रतिनिधीतालुक्यातील रवळगाव येथील शेतकरी शिवाजी जिजा रोडगे वय 60 वर्षे या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात आखाड्यावर तीन पत्ती शेडच्या लोखंडी पाइपला नायलॉन दोरी लावून आत्महत्या केल्याची घटना 16 एप्रिल सोमवार रोजी रात्री 8 ते 17 एप्रिल सकाळी सहा वाजे च्या दरम्यान आत्महत्या केली या घटनेच्या संदर्भात सेलू पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आकस्मात मृत्यू 21 या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर पांढरे हे करत आहेत

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें