भोकरदन ग्रामिण रूग्णालयाचा कारभार रामभरोसे . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 अप्रैल 2018

भोकरदन ग्रामिण रूग्णालयाचा कारभार रामभरोसे .

भोकरदन ग्रामिण रूग्णालयाचा कारभार रामभरोसे .

  

 उपविभागिय अधिकारी यांना निवेदन..


 भोकरदन प्रतिनिधी : (शेख सलीम)

  भोकरदन ग्रामिण रूग्णालयामध्ये येणार्या रूग्णांची संख्या फार मोठी असुन या रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्यासाठीच्या हालचाली सुरू असतांना येणार्या रूग्णांची हेळसांड करूण या दर्जा देण्याच्या कामाला खोडा तर घातला जात नाही ना असे निवेदन  तालुका काॅंग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष ञिंबक पाबळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

  निवेदनात पुढे म्हटले आहे की,या ग्रामिण रूग्णालयात ३व ४ वर्ग दर्जाची जवळ-जवळ १० ते १२ पदे गेल्या ६ महिण्यापासुन रिक्त असुन,गरिब रूग्णांना बाहेरच्या जिल्हा ठिकाणी रेफर करून अर्थिक भुरदड सहन करावा लागत असुन,कधी कधी रूग्णांच्या जिवावर सुद्धा बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.तालुका वैद्यकिय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांना विचारणा केली असता मोघम व उडवा उडवीची उत्तरे देऊन आपण किती कार्यक्षम अधिकारी आहोत याचं प्रदर्शन करतात असेही निवेदनात म्हटले आहे.

   भोकरदण ग्रामिण रूग्णालयात कोणत्याही प्रकारची मुबलक प्रमाणात औषधी सुद्धा नसल्याने कारण सांगितल्या जाते.करीता अशा या रूग्णालयामध्ये तातडीने सर्व पदे भरून व रूग्णांना औषध उपचाराची दखल घेण्यात येवुन आम व गरीब रूग्णांना न्याय देण्याचा डाॅक्टरांनी व अधिकार्यांनी प्रर्यंत करावा,अन्यथा तालुका काॅंग्रेस कमिटी भोकरदनच्या वतीने लोकशाही मार्गाने जनआंदोलन करणार असुन याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असेही निवेदनात म्हटले आहे.


असे आहेत रिक्त पदे :

  कनिष्ठ लिपीक : २
प्रयोग शाळा तंञज्ञ :१,
प्रयोग शाळा सहाय्यक :१,
क्षकिरण तंञज्ञ :१,
अधिपरिचारीका :२,
कक्ष सेवक :१,
सफाई कामगार : १
  
  असे एकुन ९ जागा रिक्त आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें