जिंतुर येथील शे.अनिस याची चौकशी करणयाची मागणी.
अज़मत पठान.
प्रतिनिधी.जिंतुर.
.शेख अनिस हा व्यक्ति जिंतुर तहसिल कार्यालयात कोणत्याही शासकीय पदावर कार्यरत नसताना ही दिवस भर तहसीलदार यांच्या कक्षात व त्यांच्या शासकीय गाडीत बसून राहतो याची चौकशी करुन त्याच्यावर कार्यवाही करणे बाबत निवेदन देण्यात आले
जिंतूर तहसील कार्यालयात शेख अनिस नावचा हा तरुण तहसिल कार्यालयात कोणत्याही शासकीय,अशासकीय पदावर कार्यरत नसताणही तो दिवस भर,प्रत्येक कामाच्या दिवशी सुट्टीचा दिवस वगळून तहसिल कार्यालयाच्या आवारात तसेच तहसिलदार साहेबांच्या कक्षा बाहेर खुर्ची टाकून बसलेला असतो तसेच तहसीलदार यांच्या कक्षातही त्याची विना परवानगी ये जा असते. याच्या मनमागनीने ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिकांना त्रास होत आहे. या अडचनी दूर करण्यासाठी स,य्यद नसिर सय्यद खदिर यांनी मा.ना.महसुल मंत्री साहेब,मसलहसुल मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी साहेब परभणी ,उप जिल्हाधिकारी साहेब सेलू ,यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मांगणी करण्यात आली.तहसीलदार साहेबांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांना ही तो तहसीलदार साहेबाची परवानगी घेऊन त्यांच्या कक्षात सोडतो तहसिलदार साहेबांना शासकीय,खाजगी कामा संदर्भात बाहेर जायचं असेल तर ही व्यक्ति चक्क तहसिलदार साहेबांची शासकीय गाड़ी ही चालवतो.त्याच प्रमाणे तहसिलदार साहेबांच्या अनुपस्थितित सदर व्यक्ति शासकीय गाड़ी घेऊन शहरात तसेच ग्रामीण भागात गाडीचा अंबर दिवा चालू करून स्वतः तहसीलदार यांच्या प्रमाणे फिरत असतो. तालुक्यातील वाळू माफिया, विट भट्टी धारक,लाकडाचा व्यापार करणारे नागरिक,मुरूम,लाकूड किंवा मातीची वाहतूक करणाऱ्या वाहण चालक,मालका कडून कडून तो पैशाची वसूलि करतो.तसेच तहसील कार्यलायत कार्यरत कर्मचाऱ्याना तहसीलदार यांच्या नावाने पैशाची मागणी करतो नाहीतर तहसीलदार ला सांगून कार्यवाही करायला लावून अशी धमकी त्यांना देतो.त्याच्या या प्रकाराला कंटाळून कार्यल्यातील सर्वच कर्मचार्यानी त्याची तक्रार तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्याकडे केली आहे परंतु अद्याप पर्यन्त तहसीलदार यांनी त्याच्यावर कार्यवाही करण्यात आलि नाही. दिनांक 09/03/2018 रोजी जिंतुर तहसिल कार्यालयात एका लेखी अर्ज़ाद्वारे माहिती मागितली असता दिनांक 15 03 2028 रोजी जिंतुर तहसिल कार्याल्यातून लेखी पत्र जा.क्र.2018/आस्था/कावी 439 पत्राद्वारे कळविले की सदर व्यक्ति तहसिल कार्यालयात कोणत्याही शासकीय, अशासकीय पदावर कार्यरत नाही.व तहसिल कार्यल्यातील वाहनावर वाहन चालक म्हणून एन.टी.शेलाटे असून सध्या त्याची प्रतिनियुक्ति इतरत्र झालेली आहे. पत्र व्दारे शेख अनिस याची चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मांगनी करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें