क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी ;
समाज - सुधारणेची ज्योत पेटविली - नगराध्यक्ष अब्दुल समीर;
सिल्लोड (प्रतिनिधी शेख कलीम)दि 11सिल्लोड येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सिल्लोड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौक येथील स्तंभास तसेच प्रतिमेस नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्ञी शिक्षण,सत्यशोधक समाजाची स्थापना तसेच गुलामगिरी व शेतक-यांचा आसूड यासारख्या पुस्तकांचे लेखन करीत भारतात समाज - सुधारणेची ज्योत पेटविली असल्याचे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त करीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला .
अशा भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड , माजी उपनगराध्यक्ष संजय आरके,नगरसेवक रईस मुजावर पठाण,सुनिल मिरकर, अमित आरके,मतिन देशमुख,वैभव बन्सोड, मनोज महाराज भाग्यवंत, राजेंद्र जाधव,मानसिंग राजपूत,मनोज वाघ, राजेश्वर आरके,सखाराम अहिरे, जगन्नाथ कुदळ, योगेश कुदळ, राजू आरके, विजय प्रशाद, अशोक बन्सोड, फईम पठाण,आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें