राजकारण्यांना ग्रंथालयांची भिती वाटते.—प्रा.इंद्रजित भालेराव. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 22 अप्रैल 2018

राजकारण्यांना ग्रंथालयांची भिती वाटते.—प्रा.इंद्रजित भालेराव.

राजकारण्यांना ग्रंथालयांची भिती वाटते.—प्रा.इंद्रजित भालेराव.



समशेर खान.
सेलू,ता.२२ ( बातमीदार )

लोक जास्त वाचन करून अापल्याला प्रश्न विचारतील? ग्रंथालयांचे प्रश्न सोडविले तर अापणास मतदान होईल की नाही? या भितीने बर्‍याच राजकारण्यांना ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्याची भिती वाटते असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्यिक तथा कवी प्रा.इंद्रजित भालेराव यांनी शनिवारी (ता.२१) रोजी सेलू येथिल एका कार्यक्रमाप्रसंगी केले.


येथिल स्वामी रामानंद तीर्थ हिंदी—मराठी ग्रंथालयात सेलू तालुका ग्रंथालय चळवळीच्या वतिने महाराष्र्ट राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.रामेश्वर पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात प्रा.भालेराव बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र लहाने होते.तर प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य डाॅ.शरद कुलकर्णी, अरूण चव्हाळ,सत्कारमूर्ती डाॅ.रामेश्वर पवार यांची विचारमंचार उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरूवातीला अभिजित गजमल याने ग्रंथ अामुचे साथी हे स्वागत गीत गायिले.यावेळी पुढे बोलतांना प्रा.भालेराव म्हणाले की, ग्रंथालय चळवळीचे अनेक प्रश्न प्रलंबित अाहेत.हे प्रश्न शासन का सोडवत नाही.अनेक ग्रंथालयांना स्वत:च्या इमारती नाहीत.शासनाने या ग्रंथालयांच्या इमारती न बांधल्यास देशात तुरूंगाच्या भिंती वाढतील अशी विदारक परिस्थिती सध्याला होतांना दिसत अाहे.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डाॅ.रामेश्वर पवार यांचा स्मृती चिन्ह, सन्मानपञ, शाल,श्रीफळ देवून यथोचित सत्कार करण्यात अाला.सन्मानपञाचे वाचन शरद ठाकर यांनी केले.याप्रसंगी अरूण चव्हाळ,प्राचार्य डाॅ.शरद कुलकर्णी व प्रभाकर इंगळे यांनी अापले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी तालुक्यातील ग्रंथालय चलाकांनी डाॅ.रामेश्वर पवार यांचा सत्कार केला.सत्कार उत्तर देतांना डाॅ.रामेश्वर पवार म्हणाले की, राज्यातील ग्रंथालयांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित अाहेत.अध्यक्षपदाची धूरा माझ्या खांद्यावर अाल्याने माझ्या कार्यकाळात ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजनपुर्वक लोकशाही मार्गाने राज्यभर अांदोलने करून शासनाचे लक्ष्य वेधन्याचा प्रयत्न करणार.अध्यक्षिय समारोप राजेंद्र लहाने यांनी केला.प्रास्ताविक सर्जेराव लहाने यांनी केले.सुञसंचलन सुरेश हिवाळे यांनी केले.तर अाभार बाबासाहेब चारठाणकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेलू तालुका ग्रंथालय चळवळीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी.                                                              सेलू—महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.रामेश्वर पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना प्रा.इंद्रजित भालेराव, राजेंद्र लहाने, प्राचार्य डाॅ.शरद कुलकर्णी, अरूण चव्हाळ व सेलू तालुका ग्रंथालय चळवळीचे पदाधिकारी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें