ऊषा चन्द्र परिवार एक आदर्श संघटन.
विविध उपक्रमातून निर्मान केली स्वतंत्र ओळख.
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२२एप्रिल २०१८
लातूर शहरातील सर्वपरिचीत असलेले ऊषा चन्द्र परिवार जेष्ठ नागरिक वृत्तपत्र वाचनालय म्हणजे आदर्श संघटनेचे उत्तम उदाहरण होय. संघटनेच्या वतीने शहरात नियमित विविघ उपक्रम चालविले जातात. समाज कार्यात हिरिरीने सहभाग घेत सुवर्ण व्यवसाय सांभाळून वेळोवेळी संघटन कौशल्याचा वापर करून प्रसंगी पदरमोड करून कार्यक्रमाचे आयोजन करने हे काम वाटते तेवढे सोपे नाही; मात्र प्रत्येकवेळी आपल्यातील कौशल्य पनाला लावुन हाती घेतलेले कार्य तडीस नेनारे ऊषा चन्द्र परिवाराचे उमाकांत मुंडलिक हे आवलिया व्यक्तिमत्व आहे.
शहरात मुंडलिक यांनी अनेक नवोपक्रमास जन्म देऊन समाजात एक स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रयत्नाने राबविल्या जानाऱ्या उपक्रमांची यादी खुप मोठी आहे. मात्र नोंद घ्यावी असे उपक्रम म्हणजे पक्षांसाठी अन्नछत्र, वृक्षारोपन व संवर्धन आणि ज्येष्ठांसाठी चालविले जानारे वृत्तपत्र वाचनालय आदी होय. यामाध्यमातून ते खऱ्या अर्थाने उपयुक्त अशी समाज सेवा सेवाभावनेतून अखंडपणे करित आहेत. सोन्याचा व्यवसाय सांभाळून हे सर्व करने मुळात कठिण; परंतू आवड असल्यास सवड मिळतेच हे भारतीय नरहरी सेनेचे मराठवाडा विभाग सरचिटणीस उमेश मुंडलिक यांच्या बाबतीत खरे ठरते.
त्यांच्या ऊषा चन्द्र परिवार जेष्ठ नागरिक वृत्तपत्र वाचनालयाने नुकताच एक वर्षाचा कार्यकाल पुर्ण केला आहे. या वर्षपुर्ती निमित्ताने परिवाराने नुकताच वाचनालयाचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात केक कापून साजरा केला. या समारंभास लातूर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विक्रमी रक्तदाते पारससेठ चापसी यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर सौ. उषाताई व चंद्रकांत मुंडलिक यांच्या हस्ते केक कापन्यात आला. वसुंधरा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष योगेश शर्मा व उमाकांत मुंडलिक यांच्या हस्ते कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, सदोदित पाठिंबा देनारे पारससेठ, रामेश्वर बावले, महेश ममदापूरे, अमोल स्वामी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पारससेठ यांनी जीवन कसे जगावे व सामाजिक कार्याने किती समाधान मिळते हे नमूद करून ऊषा चन्द्र ज्येष्ठ नागरिक वृत्तपत्र वाचनालय हे एक आदर्श असून मला अभिमान वाटतो असे सांगितले. तसेच वसुंधरा प्रतिष्ठान चे योगेश शर्मा यांनी मुंडलिक परिवाराचे सामाजिक कार्यातील योगदान अतिशय कौतुकास्पद असून त्यांच्या शुभेच्छा परिवारसोबत असल्याचे सांगितले.
या वेळी बोलताना वाचनालय चे प्रेरणास्थान चंद्रकांत मुंडलिक यांनी अतिशय भावपूर्ण शब्दात भावना व्यक्त करताना सांगितले की परोपकार हेच जीवन आहे व जीवन जगत असताना सामाजिक जाणीव ठेवून जगावे.
या उपक्रमातून मला विशेष आनंद व समाधान मिळतो व मी आपल्या सर्वांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून असे सामाजिक कार्य करीत असल्याचे ऊषा चन्द्र वाचनालय प्रमुख उमाकांत मुंडलिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व जेष्ठ नागरिक व ऊषा चन्द्र परिवारचे प्रीतम भैय्या मुंडलिक, उद्धव मुंडलिक, ओंकार मुंडलिक आदींसह भागातील नागरिकांच्या उपस्थितीत महेश ममदापूरे, अमोल स्वामी या सर्वांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम पार पडला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें