शेतक-यांचा खरिप पिक विमा बँकेने केला कपात. ◆देना बँकेतील प्रकार. ◆शेतक-यांनी दिले उपजिल्हाधिकारी यांना निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 अप्रैल 2018

शेतक-यांचा खरिप पिक विमा बँकेने केला कपात. ◆देना बँकेतील प्रकार. ◆शेतक-यांनी दिले उपजिल्हाधिकारी यांना निवेदन.

शेतक-यांचा खरिप पिक विमा बँकेने केला कपात.

देना बँकेतील प्रकार.

शेतक-यांनी दिले उपजिल्हाधिकारी यांना निवेदन. 

सेलु(प्रतिनिधि) :शेतक-यांना अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थीक संकटाचा सामना करावा लागत अाहे. त्यातच खरिप पिक विमा बँकेने परस्पर कपात केल्यांने शेतक-यासमोर नविन संकट उभे राहीले आहे. शेतक-यांनी आपल्या पिकांचे विमे काढले होते .शासनस्तरावरुन खरिप पिक विमा शेतक-यांच्या खात्यवर वर्ग करुन या रक्कमेतुन कोणतेही कर्ज न कापात करण्याच्या सुचना दिल्या असतांना मात्र प्रत्यक्षात बँक प्रशासनाकडुन या सुचनांना तिलांजली देण्यात येत आहे. शहरातील देना बँकेच्या शाखेत शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली पिक विम्याची रक्कम कर्ज खात्यात कपात करण्यात येत आसल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे. अगोदर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेती उत्पादनाला बसल्याने शेतक-यांची आर्थीक घडी विस्कटलेली आहे यात बँक व्यवस्थापनाने पिक विमा रक्कम कर्ज खात्यात कपात केल्याने शासनाची मिळालेली मदत शेतक-यांना मिळत नाही. तसेच देना बँकेच्या व्यवस्थापनाच्या वतिने गँस सबसिडी, शासकिय अनुदान, मनरेगाची बिले घऱकुल, शौचालय रक्कम खातेदारांच्या परस्पर बचत खात्यातुन कपात करण्यात येत आहेत. सदरिल कपात करण्यात आलेली रक्कम बचत खात्यात तात्काळ जमा करण्याची मागणी रायपुर व साळेगाव येथील शेतक-यांच्यावतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.देना बँकेने कपात केलेली रक्कम बचत खात्यात वर्ग नाही केली तर बँकेसमोर उपोषण करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाउपाध्यक्ष रामेश्वर गाडेकर, शिवाजी रामपुरकर, विष्णु गाडेकर, चंद्रकात गाडेकर, गुलाब गाडेकर, दत्ता गाडेकर, प्रकाश गाडेकर, बाळु आकात, बाबासाहेब गाडेकर, कल्याण गाडेकर, राजेंद्र गाडेकर अंकुश गायके आदी शेतक-यांनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें