राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 अप्रैल 2018

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांनी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, अजित पवार,सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, फौजिया खान यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील यांनी सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. मावळते अध्यक्ष सुनील तटकरे  यांनी जयंत पाटील यांच्या नावाची सूचना मांडली. या सूचनेला शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर वळसे पाटील यांनी पाटील बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. खजिनदारपदी हेमंत टकले यांची निवड करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस पदावर शिवाजी गर्जे यांची निवड करण्यात आली.  त्यांच्या नावाची सूचना अनिल देशमुख यांनी केली तर राजेश टोपे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी नवाब मलिक यांनी निवड झाली असून त्यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनी सूचना मांडली तर हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिले. या बैठकीला पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, जयंत पाटील, चित्रा वाघ. सुनील तटकरे, अनिल देशमुख आदींसह विविध भागातील नेते उपस्थित होते. सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा तीन वर्षांचा कालावधी यापूर्वीच संपुष्टात आलाय. परंतु गेल्या काही दिवसांतील राजकीय परिस्थिती पाहता या निवडीला उशीर झालाय. राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा चांगला दबदबा निर्माण केलाय.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें