महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी शेख राज यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 अप्रैल 2018

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी शेख राज यांची निवड.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी शेख राज यांची निवड.

सेलू (समशेर खान)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी दुस-यांदा सन्माननिय राज साहेब ठाकरे यांनी शेख राज यांची नियुक्ती केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापने पासुन शेख राज हे पक्षात सक्रीय असून त्यांनी पक्षात विविध पदावर काम करून आपला वेगऴा ठसा निर्माण केला हाेता.त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने या पुर्वी 2012 साली जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती.तेंव्हा पासुन त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही पक्षानी दिलेल्या सर्व जवाबदा-या ,आंदोलने,मोर्चे,पक्ष बांधणी या साठी आपली ताकत झोकली त्यांचे हे कार्यबाहुल्य पाहूण पक्षाने त्यांच्या कार्याची दखल  घेऊन पक्षाच्या सरचिटणीस  सौ.शालीनिताई ठाकरे व अभिजित पानसे परभणी दौ-यावर आले असता त्यांनी शेख राज यांच्या कामाचा अहवाल पक्ष प्रमुखाकडे दिला.त्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा मा.राजसाहेब ठाकरे यांनी शेख राज यानां त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा सोपवली.
या निवडी बद्दल परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्यांनी व चाहत्यांकडून शेख राज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें