जामखेडमधील हत्या जुन्या वादातून, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 अप्रैल 2018

जामखेडमधील हत्या जुन्या वादातून, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल.

जामखेडमधील हत्या जुन्या वादातून, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल.

प्रतिनिधी.अ.नगर.दि.29/04/2018.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांची हत्या ही गतवर्षी राजकीय फलक लावण्यावरून झालेल्या वादातून घडल्याचे समोर येत आहे. मृत योगेशचा भाऊ कृष्णा राळेभात याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गोविंद दत्ता गायकवाड याच्यासह इतर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ही हत्या राजकीय वैमनस्यातून नव्हे तर वैयक्तिक वादातून झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जामखेडमध्ये हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें