गंगाखेड पालम मार्ग पुर्णा महामार्गावर लाबपल्लयाचे बसेस चालु करण्याची युवक काँग्रेसने केली मागणी.
पालम ( अनीस खुरेशी )
पालम येथून पुर्णाला जाण्यासाठी पालम मार्ग कोणत्याही महामंडळाणे बस चालु केलेली नाही परीणामी प्रवासीयांना खाजगी वाहनातून जिवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तर काही प्रवासी 25 किलो मिटरच्या प्रवासासाठी नांदेड मार्ग पुर्णाला 90 किलो मिटरच्या फेऱ्याणे प्रवास करीत आहे पुर्णा हे निजामकाळापासुन महत्वाचे रेल्वे जंक्शन आहेत येथुन भारतात कोणत्याही ठिकाणी सहज प्रवास करता येते पालम व पुर्णा येथील राजकीय लोकप्रतिनिधीच कमजोर असल्यामुळेच पालम व पुर्णा शहराचा विकास झालेला नाहि परिणामी पालम व पुर्णा हे शहर विकासापासून कोसो दुर आहे संध्या लग्न सराई व उन्हाळ्याच्या सुट्टीया असल्यामूळे पुर्णा शहराला जाण्यासाठी गंगाखेड अगारातुन बसेस सुरू करावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे गंगाखेड येथील बस आगार प्रमुखाला मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी गुलाबराव दादा सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सुशांत भैय्या चौधरी,साबेर खुरेशी,शेख अहेमद,सलमान ईनामदार,रामप्रसाद कदम,उत्तम गादगे,योगेश फड,शेख सुलेमान यांच्यासह आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें