हतनुर येथील शेतातील आखाड्यावरून सालगडी झाला बेपत्ता. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 अप्रैल 2018

हतनुर येथील शेतातील आखाड्यावरून सालगडी झाला बेपत्ता.

हतनुर येथील शेतातील आखाड्यावरून सालगडी झाला बेपत्ता.


सेलु प्रतिनिधि
समशेर खान.
तालुक्यातील हतनूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेल्या आखाडयावरून तरुण सालगडी बेपत्ता  झाल्याची घटना मंगळवार 10 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे तालुक्यातील हातनुर येथील शेतकरी सतीश लक्ष्मण काकडे यांच्या शेतामध्ये पिकाचे रक्षण करण्यासाठी आखाड्यावर असलेल्या सालगडी राजेश साखाराम बाबर वय 35 वर्षे हा नेहमीप्रमाणे शेतामध्ये आखाड्यावर एकटाच झोपण्यासाठी गेला होता सकाळी शेतमालक शेतावर गेले असता त्यांना सालगडी राजेश बाबर हा आढळून आला नाही परंतु त्याचे कपडे जागेवरच होते आणि मोबाईल फोडलेल्या अवस्थेत व मोबाईलमधील सीमकार्ड बाजूला फेकून दिलेले होते प्रथम परिसरात आवाज देउन पाहिला परंतु राजेश बाबर काही आढळून आला नाही राजेश बाबरची वडील सखाराम लक्ष्मण बाबर वय 75 वर्षे यांनी सेलू पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याचा अर्ज दिला आहे या घटनेचा तपास सपोनि चौरे बाळू पुराणवाड हे करत आहेत अचानक घडलेल्या या घटनेमुळे नेमके काय झाले असेल म्हणून आखाड्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें