सेलु=रेल्वे रुळावर आढळला इसमाचा मृतदेह. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 अप्रैल 2018

सेलु=रेल्वे रुळावर आढळला इसमाचा मृतदेह.

सेलु=रेल्वे रुळावर आढळला इसमाचा मृतदह.


सेलू: प्रतिनिधी
समशेर खान.
येथील रेल्वे रुळावर डोक्याचा चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह रेल्वे पोलिसांना आढळून आला असून ही घटना मंगळवार 10 एप्रिल रोजी पहाटे 3 च्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची माहिती याप्रमाणे – सारंगी गल्ली परीसरातील ज्ञानेश्वर साहेबराव शिंदे (वय 35 वर्षे) या इसमाचा मृतदेह डोके पटरीवर ठेवलेल्या अवस्थेत चेंदामेंदा झालेल्या स्थितीत पहाटे 3 च्या सुमारास आढळून आला. रेल्वे पोलिस चौकीच्या पुर्वेस 249/0 ते 249/1 या एक किमीच्या अंतरावर आढळून आला असून रेल्वे पोलिस ठाण्यात 174 नुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सेलू उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. जालना रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मिर्झा अनवर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रशांत ढोक, महादेव पवार, पोलिस मित्र अशोक इघवे घटनेचा तपास करीत आहेत. मयत ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें