आ.विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून जिंतूर-सेलू तालुक्यास २५-१५ अंतर्गत १ कोटी रु.चा ग्रामविकास विभागाकडून निधी मंजूर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 अप्रैल 2018

आ.विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून जिंतूर-सेलू तालुक्यास २५-१५ अंतर्गत १ कोटी रु.चा ग्रामविकास विभागाकडून निधी मंजूर.

आ.विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून जिंतूर-सेलू तालुक्यास २५-१५ अंतर्गत १ कोटी रु.चा ग्रामविकास विभागाकडून निधी मंजूर.




 पठाण अजमत/ जिंतूर –
जिंतूर सेलू तालुक्यास आ.विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून जिंतूर सेलू तालुक्यास २५-१५ हेड अंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून १ कोटी रु.चा निधी मंजूर झाला आहे.

     राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधी शासनाकडे आपल्या मागण्या पाठवत असतात. त्या अनुषंगाने आ.विजय भांबळे यांनी जिंतूर सेलू तालुक्यातील काही गावात सुविधा पुरवण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी प्रयत्न करून राज्य शासनाकडून १ कोटी रु.चा निधी मंजूर करून आणला आहे. त्यात जिंतूर तालुक्यातील मौजे जोगवाडा सीसी रोड – ५ लक्ष, आकोली सभामंडप ७ लक्ष, घेवंडा सभामंडप ७ लक्ष, सावंगी (भां) सभामंडप १० लक्ष, नागनगाव सीसी रोड ५ लक्ष, जुनूनवाडी सभामंडप ७ लक्ष, निवळी बु सांस्कृतिक सभागृह ७ लक्ष, देवगाव धा  सांस्कृतिक सभागृह ५ लक्ष, राजेगाव सभामंडप ५ लक्ष, बलसा सभामंडप ६ लक्ष, तर सेलू तालुक्यात मौजे पार्डी तांडा सीसी रोड ५ लक्ष, तिडी पिंपळगाव सभामंडप ७ लक्ष, ब्राम्हणगाव प्र प्रा सांस्कृतिक सभागृह ७ लक्ष, ढेंगळी पिंपळगाव सीसी रोड ७ लक्ष,धनेगाव सिमेंट रोड ५ लक्ष मंजूर करण्यात आला आहे.

     लवकर या कामांना सुरवात करण्यात येणार असून गावात मुलभूत सोई उपलब्ध करून दिल्याने कार्यकर्त्यांनकडून समाधान व्यक्त होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें