ऑल इंडिया मजलिस-ए- ईत्तेहाद उल मुस्लीमिन पक्षातर्फे नगर परिषद सिल्लोड यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 अप्रैल 2018

ऑल इंडिया मजलिस-ए- ईत्तेहाद उल मुस्लीमिन पक्षातर्फे नगर परिषद सिल्लोड यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

ऑल इंडिया मजलिस-ए- ईत्तेहाद उल मुस्लीमिन पक्षातर्फे नगर परिषद सिल्लोड यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
url


( शेख कलीम )
सिल्लोड प्रतिनिधी

 शासन परिपत्रक नगर विकास क्र. संकीर्ण २०१०/प.क्र.१४६/२०१० दिनांक ३०/१०/२०१० अन्वये अपंग व्यक्तींसाठी समान संधी संरक्षण व समान सहभाग कायदा १९९५ च्या कलम ४० अन्वये सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अपंगासाठी राखून ठेवायच्या निधी सिल्लोड नगर परिषद हद्दीतील अपंग दिव्यंगाची ३% निधी त्वरित वाटप करावी अशी मागणी केली.
  सदरील शासकीय परिपत्रका प्रमाणे नगर परिषद सिल्लोड प्रशासनाला १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अपंगांना हा निधी वाटप करणे आवश्यक होते. पण मागील सन २०१४ पासून आजपर्यंत त्यांनी सदरील निधीचे वाटप न करता अपंगांवर अन्याय केलेला आहे. नगर परिषदेने एक प्रकारे भ्रष्ट कारभार करुन शासनाच्या डोळ्यात धूळफेकच केलेली आहे. सदरील शासन योजनेपासून अपंगांना वंचित ठेवून नगर परिषदेने त्यांचा मुलभूत हक्क हिरावून घेतला आहे.
सदरील बाब लक्षात आल्याने ऑल इंडिया मजलिस-ए- ईत्तेहाद उल मुस्लीमिन पक्षातर्फे दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी नगर परिषद विरोधात यल्गार केला आहे. MIM ता. अध्यक्ष बनेखां पठाण यांच्या नेतृत्वाखाली MIM शहर अध्यक्ष इम्रान उर्फ गुड्डू यांनी अपंगांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले कि आमचा पक्ष दिन दुबळ्या, गरीब, शेतकरी तसेच मागासलेल्या गोरगरीब जनतेसाठी कायम लढणारी पार्टी आहे. त्यामुळे ह्या गंभीर प्रश्नावर नगर परिषदेने काहीच कार्यवाही न केल्यास पक्षाच्या वतीने मोठ्या स्तरावर आंदोलन केल्या जाईल असा गंभीर ईशारा दिला आहे.
ह्या वेळेस MIM ता. अध्यक्ष बनेखां पठाण, MIM शहर अध्यक्ष इम्रान उर्फ गुड्डू, जिल्हा महासचिव प्रभाकर पारधे, शहर महासचिव इम्रानखान नूरखान पठाण, शहर उपाध्यक्ष निसार हजद, शहर सचिव सय्यद शमीम, सह सचिव मोईन पठाण, वार्ड अध्यक्ष अश्पाक पठाण, वार्ड अध्यक्ष जावेद पठाण, वार्ड अध्यक्ष शेख नईम, वार्ड अध्यक्ष शेख जुनेद, वार्ड अध्यक्ष शेख जावेद, बूथ अध्यक्ष तन्वीर मन्सुरी, वार्ड उपाध्यक्ष सलमान खान, बूथ अध्यक्ष मतीन पठाण, रईस पठाण, अजहर पठाण, शेख शकील, वासिम पठाण, सय्यद तबरेज, शेख रेहान, शेख नासेर, सय्यद जुनेद, कय्युम शहा, सद्दाम पठाण, अरबाज पठाण, नसीर पटेल, सय्यद साद, उबेद पठाण आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें